Water Crisis : मनमाडवर पाणी टंचाईचे सावट; वाघदर्डी धरणात जेमतेम पाणीसाठा

Waghdardi Dam which supplies water to the city.
Waghdardi Dam which supplies water to the city.esakal
Updated on

Water Crisis : पाणीटंचाईचे शहर म्हणून ओळख असलेल्या मनमाड शहरावर आता पाणीटंचाईचे संकट पुन्हा घोंगावू लागले आहे. पालिकेतर्फे महिन्यातून दोनदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे.

धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठी असल्याने शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. (Water Crisis Water shortage in Manmad hardly any water storage in Waghdardi Dam nashik news)

सद्य:स्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मनमाडकरांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाई ची छळ बसत आहे. पालिकेतर्फे पंधरा दिवसआड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पालखेड धरणातून मिळणारे आवर्तनाचे पाणी योग्य पद्धतीने न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मनमाडकरांवर पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वागदर्डी धरणात आणि पाटोदा येथील साठवणूक तलावात २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही ठिकाणाच्या पाणीसाठ्यातून शहराला दोन वेळेस सर्व भागात नळाद्वारे पाणी दिले जाते. पंधरा दिवसांच्या पाणीपुरवठा वितरणाच्या दिवसात आणखी काही कपात केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Waghdardi Dam which supplies water to the city.
Pune Water Supply : हांडेवाडी रस्त्याच्या गुलामअलीनगरमध्ये अपुरा व दूषित पाणी पुरवठा

सध्या शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होत आहे. सध्या जसा तापमानाचा पारा चढत आहे तसतसे पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवू लागली आहे.

"शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात आणि पाटोदा साठवण तलावात महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. मे महिन्याच्या अखेरीस पालखेड धरणाचे आवर्तन मिळावे अशी मागणी केली आहे. सध्या पाणी पुरेल याचे नियोजन केले आहे. मात्र आवर्तन न मिळाल्यास पाणीपुरवठ्याचे दिवस वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते."

- अमृत काजवे, पाणीपुरवठा अधिकारी

Waghdardi Dam which supplies water to the city.
Cold Water: उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर, आताच सावध व्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.