NMC River Cleaning : बीज स्वरूप बाहेर काढल्यास पानवेलींचा प्रश्‍न मिटणार!

वॉटर एज बोट क्लब स्वखर्चाने आठ दिवस नदी स्वच्छ करणार
Panveli Deletion work
Panveli Deletion workesakal
Updated on

NMC River Cleaning : गोदावरी व उपनद्यांवरील पानवेलीमुळे नदीपात्र झाकले गेले असून दरवर्षी होणाऱ्या या अवस्थेवर कायमस्वरुपी तोडगा काढणे शक्य आहे. त्यासाठी पानवेली बीज स्वरूपात बाहेर काढल्यास बीजाला पानवेलीचे स्वरूप येऊन खर्चासह समस्या सुटणार आहे.

यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वॉटर एज बोट क्लबने स्वखर्चाने आठ दिवस नदी स्वच्छतेचा संकल्प सोडणार असून, तसा अहवाल सादर करणार आहे. (Water Edge Boat Club will clean river for 8 days at its own expense nashik nmc news)

उन्हाळ्यामुळे गोदावरी नदीचा उपनद्यांवरील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पानवेली तयार झाली आहे. यांत्रिक पद्धतीने पानवेली काढण्यासाठी महापालिकेकडून स्मार्टसिटी कंपनीने तीन ते साडेतीन कोटी रुपये किमतीचे खरेदी केलेल्या वीड फीडिंग यंत्राचा वापर केला जात आहे.

त्यासाठी मासिक पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च होत असल्याचे समजते. मानवी पद्धतीने पानवेली हटविल्यास कमी खर्च लागतो हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. वॉटर एज बोट क्लबतर्फे या भागात मानवी पद्धतीने पानवेली हटविण्यात आली आहे.

पाण्यात पानवेलीची बी तयार होते. बी स्वरूपात असतानाच पाण्यातून हटविल्यास बीज वेलीचे स्वरूप धारण करत नाही. पानवेली बीज काढण्यासाठी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची यंत्रे नाही. महापालिकेकडून पानवेली तयार झाल्यानंतर यंत्राच्या साहाय्याने हटविले जाते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Panveli Deletion work
Unseasonal Rain : नामपूरला गारपिटीसह वादळी अवकाळी पाऊस

पाण्यात बीज तयार झाल्यास त्याचवेळी हटविल्यास पानवेलीचा सबंध राहणार नाही. स्थानिक नागरिकांना रोजगारदेखील उपलब्ध होईल. त्यामुळे मानवी पद्धतीने पानवेली हटविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वॉटर एज बोट क्लबने स्वखर्चाने आठ दिवस नदी स्वच्छतेचा संकल्प सोडणार असून, तसा अहवाल सादर करणार आहे.

"नदी पात्रातील वाढत्या पानवेलीवर मानवी पद्धतीचे काम प्रभावी ठरते. यापूर्वी पाण्यावरील घंटागाडी कामाच्या माध्यमातून हे सिद्ध झाले आहे. महापालिकेनेदेखील यांत्रिक ऐवजी मानवी पद्धतीने पानवेली काढल्यास स्थानिकांना रोजगारदेखील मिळेल. वॉटर एज बोट क्लब स्वखर्चाने आठ दिवस नदी स्वच्छतेचा संकल्प सोडणार आहे." - विक्रांत मते, माजी नगरसेवक.

Panveli Deletion work
Unseasonal Rain : करंजाडी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण; घरांचीही पडझड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.