मनमाड : वागदर्डी धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे मनमाड शहरावर ऐन हिवाळ्यात उदभवलेले पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता. १५) पाटोदा येथील साठवण तलावात पाणी घेण्यात आले आहे. आवर्तन सुटल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे.
हे पाणी वागदर्डी धरणात पोहोचल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. (Water for Manmadkar reached Patoda storage tank Currently water supply once month Nashik News)
यंदाच्या पावसाळ्यात परिसरात चांगला पाऊस झाला नसल्याने मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरले नाही. त्यामुळे जलसाठा संपुष्टात आला. मृत साठा शिल्लक असल्याने आहे.
त्यावर शहराला पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्या शहराला १८ ते २० दिवसांआड अर्थात, महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओढवले होते. धरणात पाणी नसल्याने शहराला पाणी द्यायचे कुठून? असा प्रश्न नगरपालिका प्रशासनापुढे होता.
पालखेड धरणात आरक्षित असलेल्या पाण्याच्या आवर्तनाची गरज होती. मुख्याधिकारी शेषराव चौधरी आणि आमदार सुहास कांदे यांनी आवर्तन मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.
त्यानुसार सोमवारी (ता. ११) पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावात घेण्यात आले आहे. पाटोदा येथील साठवण तलावात हे आवर्तन मिळणार आहे.
तेथून पाणी वागदर्डी धरणात पंपिंग केल्यानंतर त्याचा शहराला पुरवठा केला जाणार आहे. मात्र, वागदर्डी धरणाची क्षमता ११० दशलक्ष घनफूट असल्यामुळे पाण्याचे नियोजन करणे मोठ्या अडचणीचे ठरणार आहे.
"वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे मनमाड शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. त्यामुळे पालखेड धरणातून आवर्तन तातडीने मिळावे, यासाठी अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले. या पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपालिकेचे अधिकारी शहराला पाणीपुरवठा करतील."- सुहास कांदे, आमदार
"आवर्तनातून मिळणारे पाणी शहराला दोन महिने पुरण्याची शक्यता आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे होती. मात्र पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई जाणवू लागली असली, तरी मिळालेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल."
- शेषराव चौधरी, मुख्याधिकारी, मनमाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.