Nashik News : दहेगावच्या पाण्याला आता माणिकपुंजचा टेकू; शेवाळयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

Water supply to the city continues from Manikpunj Dam
Water supply to the city continues from Manikpunj Dam esakal
Updated on

Nashik News : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणातील पाण्याला शेवाळयुक्त वास येऊ लागल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पुन्हा माणिकपुंज धरणातून अतिरिक्त स्वरूपात पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. (water in Dahegaon dam started smelling like algae decided to supply additional water from Manikpunj dam in nashik news)

गेल्या काही महिन्यांपासून गिरणा धरणातून पालिकेला देण्यात येणाऱ्या आवर्तन अनियमितता एकीकडे वाढू लागली असताना पालिकेला जमेची बाजू असणारे दहेगाव धरणातील पाणीसाठी देखील कमी होऊ लागला आहे.

मागील काही वर्षांपासून दहेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक वाढ झाल्याने नांदगावकरांच्या पिण्याची समस्यांची तीव्रता देखील कमी झाली होती. मात्र सध्या दहेगाव धरणातील शेवटचा तिसरा व्हाल्व देखील उघडा पडला असून या जलसाठयामधून उपसा होत असलेल्या पाण्याला गढूळ पाण्यासोबत वास देखील येऊ लागला आहे.

तसेच दहेगाव धरणात २५ ते ३० फूट एवढा जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. धरणाच्या जलपातळीत देखील घट होत असल्याने जसजशी पाण्याची पातळी खालावत आहे. तसतसे गढूळ व शेवाळयुक्त पाणी उचलावे लागत  आहे.  तुरटी-ब्लिचिंग व अन्य पारंपरिक पद्धतीने शुद्धीकरण करून पाणी पुरवठा होत असला तरी पाण्याचा वास मात्र काही केल्या जात नाही. 
येवला रस्त्यावरील जलकुंभात शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविली जात असली तरी पाण्याचा वास कमी होत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water supply to the city continues from Manikpunj Dam
Nashik News : राजापूर ममदापूरच्या वनहद्दीत कॅमेऱ्यात कैद झाले वन्यप्राणी; ट्रॅप कॅमेऱ्यातून गणना

शहरातील मुख्य जलवाहिन्या व त्याला जोडून असलेल्या उपजलवाहिन्या जुनाट असून काही ठिकाणी गळत्या असल्याने त्यातून घाण पाण्यात मिसळून नळावाटे ती नागरिकांच्या घरात येऊ लागली आहे. त्यामुळे घरात पाणी पोचेपर्यंत त्याला येणारा वास कायम राहत आहे.
गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस, वारे आणि उन्ह यामुळे दहेगाव धरणातले पाणी ढवळून निघाले होते.

त्यामुळे पिवळसर, गढूळ व दुर्गंधी युक्त अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याची माहिती मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिली होती. वाढत्या तापमानामुळे जलसाठयावर देखील परिणाम झाला असून तुरटी-ब्लिचिंगचा ओव्हरडोस देखील देता येत नाही नसल्याने पर्याय म्हणून पालिका प्रशासनाने माणिकपुंज मधून पाणीपुरवठा सुरु केल्याची माहिती मुख्यधिकारी यांनी दिली आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राकडे दुलर्क्ष

दरम्यान, गिरणा धरणातून मिळणाऱ्या आवर्तनाचा कालावधी अनियमित मिळत असल्याने पालिकेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या या पत्राला काही प्रतिसाद मिळत नसल्याने माणिकपुंज धरणातून पर्यायी व्यवस्था पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. 

Water supply to the city continues from Manikpunj Dam
Onion Storage : उन्हाळ कांदा विकण्यापेक्षा साठवणूक बरी! चांगल्या भावाची अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.