Nashik Water Scarcity: नाशिक शहरासाठी 6159 दलघफू पाणी आरक्षित; गंगापूरचे पाणी सोडल्यास शहरावर पाणीकपातीचे संकट

Water scarcity likely in maharashtra Only 75 percent water storage in dams
Water scarcity likely in maharashtra Only 75 percent water storage in damsesakal
Updated on

Nashik Water Scarcity : शहराची वाढती लोकसंख्या व उद्योगांसाठी आवश्यक पाण्याचा विचार करून १५ जुलै २०२४ पर्यंत नाशिक शहरासाठी गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांतील एकूण ६,१५९ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

गंगापूर धरणातून जायकवाडीला ५०० दलघफू पाणी सोडल्यास नाशिककरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले जाण्याची शक्यता आहे. (water is released from Gangapur Dam to Jayakwadi Nashik will face water scarcity news )

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात आकस्मिक पाणी आरक्षण बैठक पार पडली. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व्यासपीठावर उपस्थित होते. नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा होतो.

या धरणांतील साठ्याच्या आधारे शहरासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यात पिण्यासाठी ४,२६५ दलघफू, तर उद्योगांसाठी ७७७ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले. गंगापूर धरणात सध्या ५,१३० दलघफू साठा आहे. यातून ५०० दलघफू पाणी जायकवाडीला सोडल्यास नाशिक शहराला पुरवठा करणे शक्य होणार नाही.

परिणामी, शहराच्या पाण्यात कपात करावी लागेल. त्यापेक्षा गंगापूर धरणाऐवजी मुकणे धरणातून ३०० दलघफू पाणी देण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली. यासंदर्भात गंगापूर धरणासमूहातील धरणांमध्ये उपलब्ध साठ्याच्या आधारे जायकवाडीला पाणी सोडण्याचा विचार होतो. मुळात गंगापूर धरण समूहातील आळंदी धरणाचे पाणी शहराला मिळत नाही. त्यामुळे या धरणास गंगापूर धरण समूहातून वगळण्याची मागणी आमदार फरांदे यांनी जलसंपदा विभागाकडे केली.

Water scarcity likely in maharashtra Only 75 percent water storage in dams
Nashik Drought News: प्रत्येक गावाला पाणी मिळाले नाही तर बघा; आमदार डॉ. राहुल आहेरांचा अधिकाऱ्यांना इशारा

...तर लोक आम्हाला मारतील

गंगापूर धरणातील पाण्याविषयी आमदार देवयानी फरांदे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती विचारत असताना सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जायकवाडीच्या प्रश्नाबाबत काहीच न बोलण्याचे धोरण ठरलेले असताना तुम्ही प्रश्न का उपस्थित करता, असा प्रतिप्रश्न आमदार फरांदेंना केला.

त्यावर आमदार फरांदेही भडकल्या, ‘तुम्हाला काही वेगळे मुद्दे मांडायचे असतील तर मांडा. पण आमची कशाला मुस्कटदाबी करता’, असे प्रत्युत्तर दिले. आता बोललो नाही, तर मतदारसंघातील लोक आम्हाला मारतील, असेही त्या म्हणाल्या.

धरणातील पाणी आरक्षण (दलघफू)

गंगापूर, काश्यपी व गौतमी गोदावरी : ४,४२२

दारणा व मुकणे : १,७३७

एकूण : ६,१५९

Water scarcity likely in maharashtra Only 75 percent water storage in dams
Nashik News: जायकवाडीला पाणी सोडण्यास सर्वपक्षीय आमदारांचा विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()