Water Management : दक्षिण प्रशांत महासागरामध्ये अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मॉन्सून लांबणीवर होणार असल्याने राज्य शासनाने पाणीटंचाईचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.
त्या अनुषंगाने ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु गंगापूर धरणात एकलहरे साठी आरक्षित असलेले २०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाणी कपात तूर्त लांबणीवर पडली आहे.
जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा व हवामान विभागाचा अंदाज घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. (Water Management Additional 200 million cubic feet of water for city cut postponed will reviewed by end of June nashik news)
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई आराखड्यासंदर्भात बैठक झाली. यापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नाशिक महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे.
त्या अंतर्गत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आठ दिवसातून एकदा पाणी कपात करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर जवळपास बाराशे बोअरवेल ताब्यात घेऊन खासगी व महापालिकेच्या विहिरी ताब्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा आढावा घेऊन जून व जुलै महिन्यात आठ दिवसातून दोनदा पाणी कपातीच्या नियोजनाचा समावेश आहे. परंतु पाणी कपात करताना त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या राज्य शासनाने सूचना दिल्या त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे.
त्यापूर्वी आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी नाशिककरांना दिलासा दिला. गंगापूर धरणातून पाच हजार आठशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे.
त्या व्यतिरिक्त एकलहरे थर्मल पावर स्टेशनला दिले जाणाऱ्या दोनशे दशलक्ष घनफूट पाणी देखील नाशिक शहराच्या पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी दिल्या एकलहरे थर्मल पावर स्टेशनच्या माध्यमातून गोदावरी नदीतून थेट पाणी उचलले जाते. त्यामुळे हे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक करांवरील पाणी कपातीचे संकट तूर्त लांबले आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
जून किंवा जुलै महिन्यात आढावा
धरणात पुरेसा पाणीसाठा आहे त्यामुळे आत्ताच पाणी आरक्षण करून वाचलेले पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे नियमितपणे पाणीपुरवठा ठेवून जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपाती संदर्भात निर्णय होऊ शकतो, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अध्यक्ष अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.
"पालकमंत्री दादा भुसे यांनी २०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तूर्त पाणी कपात करण्याचा कुठलाही विषय समोर नाही. धरणातील उपलब्ध पाणीसाठा व हवामान विभागाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल."
- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.