Water Pollution : पाण्याच्या टाकीत एक फुटापर्यंत दूषित गाळ; विष्णूनगरच्या ग्रामस्थांकडून पाहणी

Vishnunagar villagers inspecting the silt in the water tank of Solagaon water supply scheme.
Vishnunagar villagers inspecting the silt in the water tank of Solagaon water supply scheme. esakal
Updated on

Water Pollution : विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या टाकीमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचला असल्याची माहिती विष्णूनगर ग्रामस्थांनी समोर आणली.

आरोग्याचा प्रश्न असल्याने वर्कर समितीने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा टाकीवर बसून शोले स्टाइल पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. (water pollution Up to one foot of contaminated sediment in water tank solagaon nashik news)

विंचूर लासलगावसह सोळागाव पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी विंचूर येथील औद्यागिक वसाहतीत आहे. ही टाकी अनेक दिवसापासून साफसफाई केली नसल्याने या टाकीमध्ये जवळपास एक फुटापर्यंत काळ्या रंगाचा गाळ साचला आहे. यामुळे नागरिकांनी गाळमिश्रित पाणी प्यावे लागत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत अनेकवेळा आवाज उठवण्यात आला परंतु पाणीपुरवठा समितीने याची कुठलीही दखल घेतली नाही. शुक्रवारी (ता.२) विष्णूनगर ग्रामस्थांनी टाकीची पाहणी केली असता अत्यंत दूषित प्रकारचा गाळ आढळून आला आहे, त्यामुळे नागरिक संतप्त झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vishnunagar villagers inspecting the silt in the water tank of Solagaon water supply scheme.
Shettale Yojana : वॉटरबँकेला गती, बागायत फुलणार!

गाळ त्वरित काढावा अन्यथा टाकीवर बसून शोले स्टाइल पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा विष्णूनगर ग्रामस्थांनी दिला आहे.

"सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता अनेक दिवसापासून टाकी साफसफाई केली नसल्याने दूषित गाळ साचल्याचे आढळले. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. लवकरात लवकर साफसफाई करावी अन्यथा टाकीवर बसून आंदोलन करण्यात येईल." - नंदू भडांगे, विष्णूनगर नागरिक.

Vishnunagar villagers inspecting the silt in the water tank of Solagaon water supply scheme.
Nashik Rain Update : वीज पडून लागलेल्या आगीत जनावरांचा चारा खाक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.