नाशिक : गंगापूर धरण (gangapur dam) समूहात ५० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झाल्यानंतर एक दिवसाची पाणीकपात (water shortage) महापालिकेने सुरू केली आहे; परंतु एकीकडे पाणीकपात करताना दुसरीकडे गुरुवारी (ता. २९) मराठवाड्याला पाणी सोडले जाणार असल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून, शहरातील पाणीकपात तातडीने रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (water-reduction-in-Nashik-and give-to-Marathwada-marathi-news-jpd93)
महापालिकेचा अजब कारभार; पुढील आठवड्यात बैठक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे धरणाच्या परिसरात पावसाने ओढ दिली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने महापालिकेने आठवड्यातून एकदा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आठवड्यांपासून नियमित कपात केली जात असून, आतापर्यंत सुमारे १५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत झाली आहे. महापालिकेने उचललेल्या अतिरिक्त आरक्षित पाण्याची भर त्यातून काढली जाणार आहे. धरण परिसरात पावसाची संततधार असल्याने दारणा धरण ७८ टक्क्यांच्या वर भरले असून, साडेतीन हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. ४४ टक्के भरलेल्या मुकणे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण ७६ टक्क्यांच्या वर भरल्याने या धरणातून पाचशे क्यूसेक वेगाने गुरुवारी पाणी सोडले जाणार आहे. पावसाची धार कायम राहिल्यास विसर्ग अधिक वाढविला जाणार आहे; परंतु नाशिक शहरात पाणीबचतीसाठी कपात केली जात असताना नांदूरमध्यमेश्वर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडले जात असल्याने नाशिककरांवर कपात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जलसाठ्याचा आढावा घेऊन निर्णय
पन्नास टक्क्यांच्या वर धरणातील जलसाठा पोचल्यानंतर पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. आता गंगापूर, दारणा धरणातील जलसाठा ७५ टक्क्यांच्या वर पोचला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्यापही पाणीकपात मागे घेतली जात नसल्याने रोष वाढत आहे. पाणीकपातीचा फेरविचार करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.