Tribal Development: जल आरक्षण- जल संवर्धन यात्रा सुरू; आदिवासी बांधवामध्ये होणार जल जागृती

Nitin Gangurde and tribal brothers who participated in water reservation yatra
Nitin Gangurde and tribal brothers who participated in water reservation yatraesakal
Updated on

Tribal Development : पश्चिम वाहिनी नार पार नद्यांच्या खोऱ्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जल आरक्षण यात्रा सुरू झाली. जल परिषदेतर्फे दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी देवसाने मांजरपाडा प्रकल्प येथून जल आरक्षण यात्रेस सुरवात केली आहे.

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आदिवासी बांधवामध्ये जलजागृती करण्यात येत आहे. (Water Reservation Water Conservation Yatra Begins There will be water awareness among tribals nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जलजागर यात्रेचा शुभारंभ देवसाने सरपंच प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. जलपरिषदेचे अध्यक्ष देविदास कामडी यांनी जल आरक्षण यात्रेचा उद्देश सांगितला. संयोजक नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी पाणी वाचविण्याचे आवाहन केले.

या वेळी ‘जल संवर्धन’, ‘जल आरक्षण’, ‘पाणी आडवा- पाणी जिरवा’, ‘वृक्ष संवर्धन’ आदी घोषणा देण्यात आल्या. नवनाथ गांगोडे यांनी आभार मानले. जल आरक्षण यात्रा आदिवासी बांधवांना पाण्याचे संवर्धन आरक्षण करण्याचा संदेश देत वणी, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर, सुरगाणा, बाऱ्हे, ननाशी आदी भागांत जाणार आहे.

दरम्यानन, नाशिक जिल्ह्यात केम डोंगराच्या पायथ्याशी नार पारसह इतर सात नद्या उगम पावतात. दिंडोरी तालुक्यात दमण गंगा नदी उगम पावते. या सर्व नद्या पश्चिम वहिनी होत दमणच्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nitin Gangurde and tribal brothers who participated in water reservation yatra
Festival Unity: विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद मिलाद’ मिरवणूक! सलोख्याचे दर्शन; एकमेकांच्या मिरवणुकीचे स्वागत

या नद्यांच्या खोऱ्यात प्रचंड पाऊस पावसाळ्यात असतो. उन्हाळ्यात शेतीलाच काय, पण पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. अनेक गावांत महिलांना पायपीट करावी लागते. शासन मराठवड्यासाठी १३०० कोटी रुपये खर्च करून तहान भागू शकते.

पेठ, सुरगाणा व दिंडोरीचे पाणी जायकवाडी प्रकल्पात जाऊ शकते, पण स्थानिक ठिकाणी पाणी मिळत नाही. आरक्षण केवळ कागदावर राहिले. नवीन अनेक कमी खर्चाच्या साईट नार पार खोऱ्यात आहेत. त्या झाल्या, तर आदिवासींचा पाणीप्रश्नही सुटेल व आदिवासींचे स्थलांतर थांबेल.

शासनाच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर निर्णय होत नाही, म्हणून भविष्य काळात या भागात लोकसहभागातून वनराई बंधारे उभे राहावेत, शासनाकडून होणाऱ्या पाणी प्रकल्पांमध्ये पाणी आरक्षण मिळावे, यासाठी जलजागर अभियान नार पार दमण गंगा गोदावरी खोऱ्यात सुरू केले आहे.

मांजरपाडा प्रकल्प पार नदी उगमजवळ जल आरक्षण- जल संवर्धन यात्रेस सुरुवात करण्यात आली.

Nitin Gangurde and tribal brothers who participated in water reservation yatra
Nashik News: डॉ. नानासाहेब परुळेकर यांना कुंचल्यातून रंगवंदना! कलाशिक्षक संजय जगताप यांनी रेखाटले चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.