Nashik News: जिल्ह्यात 27 गावांतील पाण्याचे नमुने दूषित; सिन्नर तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी

contaminated water
contaminated wateresakal
Updated on

Nashik News: नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे दूषित पाण्याने ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. या प्रकारानंतर दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

यातच, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या एक हजार ८३९ नमुन्यांपैकी तपासणीत जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील २७ गावांतील पाणी नमुने दूषित आढळले. यात सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक नऊ पाण्याचे नमुने (१४ टक्के) दूषित आहेत. (Water samples from 27 villages in district were contaminated nashik news)

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असून, पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होऊ लागला आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे काही स्रोत दूषित आढळत आहे. त्यामुळे उपाययोजना करूनही दूषित पाण्याचा वापर करावा लागतो. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.

दर महिन्याला ही तपासणी केली जाते. यात नोव्हेंबरमध्ये १५ तालुक्यांतील एक हजार ८३९ गावांमधील पाण्याचे नमुने घेतले असता यातील २७ नमुने दूषित आढळले. दूषित पाणी व ब्लिचिंग पावडरचे नमुने आढळणाऱ्या ग्रामपंचायती तसेच पंचायत समितींना नोटीस बजावण्यात येते. दुसरीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोनदा केले जाते.

अभियानात केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायतींना लाल कार्ड, पिवळे कार्ड, हिरवे कार्ड वितरित करण्यात येते. लाल व पिवळे कार्ड प्राप्त ग्रामपंचायत स्रोतांच्या त्रुटीत सुधारणा करून हिरवे कार्डात रूपांतर करण्यात येते. जिल्ह्यात गत काही दिवसांत साथरोगांचे प्रमाणही वाढले आहे. डेंगीचे रुग्णही आढळून आले आहेत. घाणीचे साम्राज्य व दूषित पाणी यामुळे साथरोगांचे प्रमाण वाढत आहे.

contaminated water
Nashik: ऑनलाईन हजेरीने वाढवली शिक्षकांची डोकेदुखी! सर्व्‍हर डाऊनमुळे आदिवासी, डोंगराळ भागातील शिक्षक अडचणीत

गत महिन्याच्या तुलनेत घट

नोव्हेंबरमध्ये २७ नमुने दूषित आढळले असले, तरी गत महिन्याच्या तुलनेत यात घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये १५ तालुक्यांतील दोन हजार ५४९ पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. यातील ६७ पाणी नमुने दूषित सापडले होते. या महिन्यात मात्र यात घट झाल्याचे दिसून येते.

तालुकानिहाय दूषित नमुने

तालुके तपासलेले पाणी नमुने दूषित नमुने

सिन्नर ६४ ०९

मालेगाव १५४ ०६

त्र्यंबकेश्वर १४० ०४

देवळा ८६ ०२

सुरगाणा २२७ ०४

चांदवड ६७ ०१

नांदगाव ८५ ०१

contaminated water
Nashik Water Cut: शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.