दरेगाव (जि. नाशिक) : दरेगाव (ता. चांदवड) येथे कुपनलिका (Handpump) नादुरुस्त झाल्याने पाणीटंचाई (water Scarcity) निर्माण झाली आहे. परिसरातील कुपनलिकाच तहानलेल्या असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Water shortage in Daregaon due to closure of Handpump Nashik Water Crisis News)
दरेगाव येथे दोन महिन्यांपासून कुपनलिका (हातपंप) दोन ते तीन महिन्यांपासून नादुरुस्त झाल्याने पिण्याच्या पाण्याची तारांबळ झाली आहे. पंधरा दिवसांपासून चांदवड पंचायत समितीमार्फत पाण्याचा टॅंकर दरेगाव येथे चालू करण्यात आला आहे. टॅंकरचे पाणी विहिरीत सोडले जाते. विहिरीतून पाण्याच्या टाकीत टाकले जाते. मात्र, टाकीचे पाणी पंधरा दिवसांतून एकदा सोडले जाते. कूपनलिकेला थोड्याफार प्रमाणात पाणी येत असल्यामुळे दोन महिन्यांपासून कुपनलिका बंद आहेत.
पिण्याचे पाणी व वापराण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी उन्हाळा लागल्यावर का होईना थोड्याफार प्रमाणात मिळत होते. मात्र, पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने या योजनेचे पाणी बंद आहे. दरेगाव परीसरात उन्हाळा लागला का पाणीटंचाई निर्माण होते. पाणीपातळी खालावल्याने कुपनलिका व विहिरीचे पाणी कमी झाल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. दरेगाव येथील कुपनलिका दुर्लक्षाअभावी बंदच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.