Water Shortage: अवघ्या 24 तासांत जलसंकटावर केली मात! खोकरविहीर- चिंचपाडा येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Supply Through Tankers
Water Supply Through Tankersesakal
Updated on

Water Shortage : लोकप्रतिनिधी, तालूका प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या तत्पर सहकार्याने खोकरविहीर-चिंचपाडा (ता. सुरगाणा) येथील जल संकटावर टँकरच्या माध्यमातून २४ तासात मात करण्यात आली. (Water shortage overcome in just 24 hours Water supply through tankers at Khokarvehir Chinchpada nashik news)

या गावातील पाणीटंचाईचे भिषण वास्तव समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत टँकर पाठवीण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गावात तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.

यापूर्वी गावातील महिला व नागरिकांनी विहीर स्वच्छ करून त्यातील गाळ काढून टाकला. त्यानंतर टॅंकरचे पाणी विहीरीत सोडण्यात आले‌. विहिरीत पाणी पडताच महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

आंबोडे येथील सरपंच राजेंद्र निकुळे, सर्कल अधिकारी ज्ञानेश्‍वर डोंगरे, तलाठी पी. पी. वाघमारे, कोतवाल योगेश जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी, पेसा अध्यक्ष मनोहर जाधव, भास्कर वार्डे, देवीदास पाडवी, हंसराज चौधरी यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Supply Through Tankers
Yeola Bazar Samiti: भुजबळांचे संचालकांशी गुप्तगु, मात्र नाव आजच ठरणार! सभापतीपदी सविता पवार की संजय बनकर?

"गेल्या गुरूवारी (ता. १८) पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन टँकरसाठी प्रस्ताव दिला होता. आंबोडे येथील दत्तु बाळू गावीत यांच्या विहिरीला भरपूर पाणी असल्याने तेथून खोकरविहीर (चिंचपाडा) गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास त्यांची सहमती असल्याने विहिर अधिग्रहण करावी, असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते."

-राजेंद्र निकुळे, सरपंच, आंबोडे

"यापूर्वी महिलांना दूरवर जाऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतू, आमच्यासाठी चोवीस तासाच्या आत टँकरद्वारे पाण्याची सोय करून दिल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सरपंच राजेंद्र निकुळे यांच्यासह प्रशासन व ग्रामस्थांचे आभार."

-रंजना रमेश बारे, खोकरविहीर-चिंचपाडा

Water Supply Through Tankers
Summer Onion Storage : रखरखीत उन्हात कांद्याची साठवणूक; सिन्नरच्या पूर्व, पश्‍चिम भागातील चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.