Water Crisis : अर्धा जिल्हा बागायतदारांचा आणि अर्धा दुष्काळी. त्यातच यंदा अद्याप पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यात जिल्हावासीयांची तहान टँकरवर भागविण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील ६२ गावे व ३४ वाड्यांना ९६ ठिकाणी सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अर्थात, दुष्काळी व अवर्षणप्रवण भागातच टंचाईची तीव्रता अधिक आहे. (water shortage rain crisis 96 villages and settlements quench their thirst on tankers nashik)
यंदा ऑगस्टचा दुसरा आठवडा संपत आला, तरी मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, धरणे पाण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. आतापर्यंत खरिपाची पेरणी झाली, तीही रिमझिम पावसावरच झाली आहे.
भूजल पातळीत वाढ होत नसून, तहान भागविणारे जलस्रोत कोरडे असल्याने उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर अद्यापही बंद झालेले नाहीत. विशेषत: जिल्ह्यातील अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात जानेवारी-फेब्रुवारीपासून टँकरची गरज भासते.
त्यातही देवळा, नांदगाव, येवला या तालुक्यांना सर्वांत अगोदर टँकरची गरज असते. यंदाही मार्चपासूनच टंचाईने डोके वर काढत जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे.
मेमध्ये यात वाढ झाली होती. आताही गावांची संख्या तशीच आहे. पावसाअभावी जूनसह जुलैतही एकही टँकर कमी झालेला नाही.
येवला, मालेगावला टंचाईचा दणका
सध्या जिल्ह्यात ६२ गावे व ३४ वाड्या मिळून ९६ ठिकाणी ५२ टँकरद्वारे रोज १३१ खेपा पाणीपुरवठा होत असून, या पाण्यावर एक लाख ३१ हजार नागरिकांची तहान भागली जात आहे. विविध ठिकाणी गावांसाठी व टँकर भरण्यासाठी ३८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
पाऊस लांबल्यास ही परिस्थिती अजूनच बिकट होण्याची चिन्हे आहेत. टंचाईचा सर्वाधिक फटका येवला तालुक्याला बसतो. ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या या तालुक्यात उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर अद्यापही सुरू असून, आजमितीस २८ गावे व १२ वाड्यांना १६ टँकरद्वारे रोज ४० टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
मालेगाव तालुक्यात दहा गावे व आठ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, चांदवड तालुक्यातही १६ गावे-वाड्यांची तहान सात टँकरने रोज २४ फेऱ्या करून भागवली जात आहे. तसेच दुष्काळी सिन्नर, नांदगाव, देवळा, बागलाण तालुक्यांतही टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संख्या घटतेय अन वाढतेय!
जिल्ह्यातील टँकरची संख्या हळूहळू कमी होत आहे. तीन आठवड्यांपूर्वी १०५ ठिकाणी टँकर सुरू होते. ही संख्या ९६ वर आली आहे. अर्थात, पाऊस नसल्याने मागणी कायमच आहे.
येवल्यात गाव-वाड्यांची संख्या ५२ वरून ४० वर आली असली, तरी पुन्हा बंद झालेल्या गावातून टँकरची मागणी होऊ लागली. त्यामुळे येणारा काळ नक्कीच परीक्षेचाच मानला जातोय.
"येवल्यात टंचाईची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आजही ४० गावे-वाड्यांवर टँकर सुरू आहे. काही गावांचे टँकर बंद झाले. मात्र, पाऊस लांबल्याने पुन्हा टँकरची मागणी होताना दिसते. पाणी उपलब्ध होईपर्यंत मागणीप्रमाणे पाणीपुरवठा सुरूच ठेवण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत."
- रफीक शेख, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पंचायत समिती, येवला
जिल्ह्यातील गावे अन टँकर..!
तालुका...गावे वाड्या...मंजूर टॅंकर...फेऱ्या
बागलाण..७...३..११
चांदवड..१६...७..२४
देवळा...६..३..२
मालेगाव...१८...१३...१६
नांदगाव...५...८...९
सिन्नर...४...२..३
येवला...४०...१६...४०
एकूण...९६...५२...१३१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.