मालेगाव : शहराला पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

Water pipeline damage
Water pipeline damageesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा धरणातून येणारी मुख्य जलवाहिनी उंबरदे गावानजीक फुटल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

जलवाहिनी दुरुस्तीसाठी किमान एक दिवस लागणार असून शहरवासीयांनी पाणीसाठ्याचा जपून वापर करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Water pipeline damage
नाशिक : नागरिकांनो, स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रतिसाद नोंदवा

जलवाहिनी फुटल्याचा प्रकार लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी येथे धाव घेतली. घटनास्थळी जलवाहिनी फुटल्याने सुमारे २० ते २५ फूट उंचीची उंच फवारे दूर अंतरावर उडत असल्याने जवळ जाणे शक्य होत नाही. गिरणा पंपींग यासाठी काही काळ बंद करावे लागणार आहे. जलवाहिनीचे पाणी नजीकच्या अनेक शेतात शिरले आहे . नुकसानीचा निश्चित अंदाज समजू शकणार नाही. ऐन उन्हाळ्यात जलवाहिनी फुटल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने मुख्य जलवाहिनीकडे दुरुस्तीसाठी नियमित लक्ष देतानाच वारंवार गस्त घालावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Water pipeline damage
राज ठाकरे प्रचाराला आले खरे पण लक्ष्मण जगतापांना त्याचा तोटाच झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.