Nashik Water Supply: शहरात शुक्रवारपासून 2 दिवसांआड पाणीपुरवठा : आयुक्त भालचंद्र गोसावी

Water supply
Water supplyesakal
Updated on

Nashik Water Supply : जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. ‘अल-निनो’ समुद्र प्रवाह सक्रियतेमुळे राज्यात सद्या सर्वच ठिकाणी कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणाचे पाणलोट क्षेत्रातही अत्यल्प पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा मर्यादित आहे. शहरात पाणीटंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

ऑक्टोबर अखेरपर्यंत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने १ सप्टेंबरपासून शहराचा पाणीपुरवठा हा दोन दिवसांआड करण्यात येत असल्याचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी कळविले आहे. (Water supply in city every 2 days from Friday Commissioner Bhalchandra Gosavi nashik)

चणकापूर आणि गिरणा धरणातील आरक्षित असलेला मर्यादित पाणीसाठा हा ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुरविणेसाठी कटिबद्ध नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन दिवसांआड पाणीपुरवठा करणे अनिवार्य झाले आहे.

शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत त्यांनी तत्काळ तोट्या लावून घेणे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. शहरवासीयांनी यासंदर्भात सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गोसावी यांनी केले आहे.

शुक्रवारी (ता. १) कॅम्प पंपिंग मोठा जलकुंभ, निहालनगर जलकुंभ, पाच लाख जलकुंभ, विजयवाडी पंपिंग झोन, क्वॉटेज झोन,

सर सय्यद (पार्ट २) जलकुंभ, आझादनगर उत्तर जलकुंभ, सायने जलकुंभ, निहालनगर (पार्ट २) जलकुंभ, संगमेश्वर मेन जलकुंभ, म्हाळदे घरकुल जलकुंभ, निहालनगर (जुनी) मेन जलकुंभ, निहालनगर (नवीन) जलकुंभ या जलकुंभ व झोनच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water supply
Nashik NCP: ‘राष्ट्रवादी’ची संघटनात्मक पुनर्रचना; निष्ठावान कार्यकर्त्यांना सामावून घेण्याच्या धोरणाचा भाग

शनिवारी (ता. २) तीन लाख जलकुंभ, कॅम्प जलकुंभ सोयगाव हद्दवाढसह, रविवार वार्ड जलकुंभ, रजापुरा जलकुंभ, आझादनगर दक्षिण जलकुंभ, संगमेश्वर पार्ट जलकुंभ, सर्व्हे नं.११९/१२० जलकुंभ,

दरेगाव गावठाण जलकुंभ, न्यू बस स्टॅन्ड (अप्सरा) जलकुंभ, क्वॉटेज झोन (पार्ट २) जलकुंभ, मोतीबाग नाका जलकुंभ, बाग ए महेमुद जलकुंभ, सर सय्यद मेन जलकुंभ, छोटी कॅम्प सोयगाव गावठाण झोन. रविवारी (ता. ३) पाच लाख (पार्ट २) जलकुंभ, रविवार वॉर्ड (पार्ट २) जलकुंभ, गुलाब पार्क जलकुंभ,

जैन स्थानक जलकुंभ, न्यू आझादनगर (बायपास) जलकुंभ, गुलाब पार्क (पार्ट २) जलकुंभ, पॅराडाईज जलकुंभ, शफी पार्क जलकुंभ, म्हाळदे गाव जलकुंभ, निहालनगर (नवीन) जलकुंभ, शिवनगर जलकुंभ,

निहालनगर (जुनी) जलकुंभ, क्वॉटेज झोन जलकुंभ, भायगाव गावठाण व शिवारअंतर्गत येणारे झोन, विजयवाडी पंपिंग अंतर्गत येणारे झोन. याप्रमाणे पाणीपुरवठा होईल. यानंतर शहरात नियमितपणे दोन दिवसांआड पाणीपुरवठा होईल. शहरवासीयांनी पाणीपुरवठा बदलाची नोंद घेऊन मनपा पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे. पाण्याचा जपून वापर करावा.

Water supply
Nashik News: गिरणा खोरे पुन्हा उपाशी ठेवणार का? वांजूळ पाणी संघर्ष समितीचा अजित पवारांना प्रश्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.