Water Crisis : लासलगावसह 16 गाव पाणीयोजनेचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित

Secretary Sharad Patil while guiding the meeting of beneficiary villages of Sola Gaon Samiti at Gram Panchayat Head Office. Sarpanch present in front
Secretary Sharad Patil while guiding the meeting of beneficiary villages of Sola Gaon Samiti at Gram Panchayat Head Office. Sarpanch present in frontesakal
Updated on

Water Crisis : लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना पुन्हा विस्कळित झाली आहे. सुरळीत पाणीपुरवठ्याच्या प्रतीक्षेत लाभार्थी गावांचे नागरिक असून सोळा गाव समितीचे सचिव शरद पाटील यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान योजनेचे तेरा लाख रुपये वीजबिल आणि अनामत रक्कम २९ लाख रुपये न भरल्यास योजनेचा वीजपुरवठा खंडित होणार आहे, मात्र बैठकीत यावर फारशी चर्चा न करता अनेकांनी काढता पाय घेतला.

दरम्यान याप्रश्‍नी उद्या (ता.११) नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (Water supply of 16 village water scheme including Lasalgaon disrupted again nashik news)

लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसून सतत होणाऱ्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला आहे.

यासंदर्भात सोळा गाव पाणीपुरवठा लाभार्थी गावाच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची लासलगाव येथे बैठक झाली. त्यात समितीचे सचिव शरद पाटील यांनी ‘भाकरी फिरवण्याची गरज’ असून आपण या पदावरून लवकरच मुक्त होणार असल्याचे सांगितले.

या समितीचे सचिव शरद पाटील यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या ठिकाणी लाभार्थी गावातील अन्य ग्रामसेवकाची निवड करावी असे सांगितले परंतु सचिवपद घेण्यास कोणताही ग्रामसेवक तयार नाही.

श्री. पाटील यांनीच यापूर्वी पाच वेळा राजीनामा देऊनही तो मंजूर केला जात नाही. या महिन्यात तेरा लाख वीजबिल आले असून सोळा लाख अनामत रक्कम अशी २९ लाख रुपये बारा मेपर्यंत भरावयाचे आहे, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसे झाल्यास त्यास वीस हजार रुपये दंड व सात हजार रुपये जोडणी चार्ज हे सुद्धा भरावे लागणार आहे.

योजनेचे वीजबिल या गंभीर विषयावर निर्णय घेण्याअगोदरच बऱ्याच सदस्यांनी काढता पाय घेतला. पाणी येत नाही तर वीजबिल बिल कसे? त्यामुळे हा मुद्दा चर्चा न होताच मागे पडला. दरम्यान उद्या (ता.१८) चारला नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारींच्या दालनात पाणीपुरवठा समितीची बैठक होत आहे. त्यामुळे काय निर्णय होतो यावरच आता योजनेचे भवितव्य ठरणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Secretary Sharad Patil while guiding the meeting of beneficiary villages of Sola Gaon Samiti at Gram Panchayat Head Office. Sarpanch present in front
Crop Competition: राज्यस्तरीय पीकस्पर्धेत चौसाळेचे तुंगार दुसरे! सोयाबिनचे काढले हेक्टरी 38 क्विंटल उत्पन्न

बैठकीला समितीचे सचिव शरद पाटील, पिंपळगाव नजीकचे सरपंच काशिनाथ माळी, उपसरपंच हिरामण घोडे, कोटमगावच्या सरपंच आरती कडाळे, उपसरपंच योगेश पवार, टाकळी विंचूरचे उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे, विंचूरचे ग्रामसेवक जी. टी. खैरनार, ब्राह्मणगाव विंचूर ग्रामसेवक डी. टी. साळुंखे, निमगाव वाकडा ग्रामसेवक योगेश बत्तीशे, कोटमगाव ग्रामसेवक एस. एस. धिवर उपस्थित होते.

"गेल्या अनेक दिवसापासून सोळा गाव समितीचे सचिवपद माझ्याकडे आहे. मी ग्रामसेवक आहे, त्यामुळे यापुढे ही जबाबदारी लाभार्थी गावातील ग्रामसेवकांकडे रोटेशन पद्धतीने दिल्यास कारभार सुरळीत होण्यात मदत होईल."

- शरद पाटील, सचिव, सोळा गाव पाणीपुरवठा समिती.

"गेल्या पन्नाल दिवसापासून माझ्या गावाला पाणीपुरवठा नाही, मग कोणत्या आधारावर ग्रामस्थ पाणी बिल भरतील? समितीने पाणीपुरवठा सुरळीत केल्यास नागरिक पाणी बिल थकवणार नाही." - काशिनाथ माळी, सरपंच, पिंपळगाव नजीक.

Secretary Sharad Patil while guiding the meeting of beneficiary villages of Sola Gaon Samiti at Gram Panchayat Head Office. Sarpanch present in front
Mango Crop Crisis : यंदा गावरान आंब्याची चव दुरापास्त; वातावरण बदलाचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.