Nashik News : 4 गावांचा पाणीपुरवठा वारंवार खंडित! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना जगात नावाजलेली असली, तरी गळती व वीजपंप जळाल्याची कारणे देत चार गावांचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे.
Maharashtra Jeevan Pradhikaran
Maharashtra Jeevan Pradhikaranesakal
Updated on

लखमापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना जगात नावाजलेली असली, तरी गळती व वीजपंप जळाल्याची कारणे देत चार गावांचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

यामुळे प्राधिकरणाचा भोंगळ कारभार कधी थांबणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. (Water supply of 4 villages repeatedly interrupted Mismanagement of Maharashtra Life Authority Nashik News)

दिंडोरी तालुक्यातील जानोरी, मोहाडी, जऊळके-दिंडोरी व ओझर (ता. निफाड) या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पालखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या गावांना जोडणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी वारंवार फुटते.

यामुळे वरील गावांना होणारा पाणीपुरवठा अनेकदा तीन दिवस बंद असतो. त्यामुळे गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आता तीन दिवसांपासून पुन्हा एकदा धरणातील पंप जळाल्याचे कारण देत पुन्हा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

या योजनेची मुख्य जलवाहिनीला वारंवार होणारी गळती, तसेच धरणावरील पंपात बिघाड हे कारणे पुढे करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वरील गावे वेठीस धरले जात आहेत.

प्राधिकरणाच्या कारभारात सुधारणा होण्याची मागणी होत असताना, सुधारणा मात्र होत नाही. त्यामुळे त्यांना कुणी वाली आहे की नाही, असा सवाल विचारला जात आहे.

Maharashtra Jeevan Pradhikaran
Panchavati Express: मुंबई- मनमाड प्रवासात महिलांसाठी आरक्षित डबा! पंचवटी एक्स्प्रेस चाकरमानी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

ओझरसह जानोरी, मोहाडी, जऊळके-दिंडोरी या गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून ठप्प झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून धरणावरील पंपाची दुरुस्ती करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, संबंधित गावच्या नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Maharashtra Jeevan Pradhikaran
Nashik News : ‘कादवा’चे 2 लाख टन गाळप! 59 हजार लिटर इथेनॉलची निर्मिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()