Nashik News: पंचवटी अमरधाममध्ये पाणीपुरवठा बंद! मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी घेऊन येण्याची वेळ

Taps running dry due to lack of water in Amardham.
Taps running dry due to lack of water in Amardham.esakal
Updated on

Nashik News : पंचवटी अमरधाममध्ये पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. येथे पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी घेऊन येण्याची वेळ आली आहे.

काहींना येथे आल्यानंतर पाणी नसल्याचे कळत असल्याने त्यांना इतरत्र जाऊन पाण्याचा शोध घेण्यासाठी रिकामी भांडी घेऊन जावे लागत आहे. (Water supply stopped in Panchavati Amardham bring water from home to relatives of deceased Nashik News)

पंचवटी अमरधाममध्ये पाण्याच्या टाक्यांच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर हातपाय धुण्यासाठी येथील टाक्यांमधील पाण्याचा वापर करतात.

तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी पाणी देण्यासाठी येथून भांडी भरून पाणी नेण्यात येते. सध्या येथील पाणी पुरवठाच बंद असल्यामुळे पाण्याच्या टाक्या कोरड्याठाक पडल्या आहेत.

सध्या येथे येणाऱ्या नातेवाइकांना पाण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागत आहे. ज्यांना येथे येण्याअगोदर पाणी नसल्याचे कळते ते घरून येतानाच पाण्याची भांडी भरून आणतात. मात्र, ज्यांना माहिती नाही ते येथे आल्यानंतर पाण्याची शोधाशोध करून पाणी आणतात.

जवळ वस्ती नसल्याने दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महापालिकेकडून मोफत अंत्यसंस्काराचा गाजावाजा केला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Taps running dry due to lack of water in Amardham.
Engineering Degree Admission : अभियांत्रिकी पदविकेला पसंती! 28 हजार 750 जणांची नोंदणी

मात्र, अमरधाममध्ये साध्या सुविधा पुरविल्या जात नसल्याने नातेवाइकांना त्रास होतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. एकीकडे गोदावरी नदी वाहत असताना तिच्या काठावर असलेल्या पंचवटी अमरधाममध्ये पाण्याची टंचाई आहे.

अंत्यसंस्कारासाठी गोदापात्रातून पाणी घ्यावे असे पाणी पात्रातून वाहत नाही. सांडपाणी मिसळत असल्याने त्याला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे असे सांडपाणी आणणार तरी कसे, असा प्रश्न पडत आहे.

पंचवटी अमरधाममध्ये एक बेड तुटलेले आहे. येथे बसविण्यात आलेल्या दहा दिव्यांपैकी पाच दिवे फुटलेले आहेत. एक बंद आहे.

केवळ चार दिवे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. काही पायऱ्यांच्या फरशा तुटल्या आहेत.

Taps running dry due to lack of water in Amardham.
Sula Vineyards: ‘सुला’च्‍या CEOपदी करन वसानींची नियुक्‍ती; राठी यांचा राजीनामा सामंतांकडून मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.