Fire Audit नसलेल्या रुग्णालयांचा पाणीपुरवठा खंडित होणार

fire audit
fire auditesakal
Updated on

नाशिक : शहरातील १८७ रुग्णालयांनी महापालिकेला अद्याप फायर ऑडिट प्रमाणपत्र (Fire Audit Certificate) सादर केलेले नसल्याने महापालिका (NMC) संबंधित रुग्णालयांची नळजोडणी तोडणार आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या (Firefighters department) सूत्रांनी ही माहिती दिली. शहरात एकूण ६०७ रुग्णालये असून, महापालिका अग्निशामक दलाने नोटिसा पाठविल्यानंतर ४२० हॉस्पिटल प्रशासनाने फायर ऑडिट करून घेतले आहे. (Water supply to hospitals without Fire Audit Certificate will be disrupted nashik news)

एकूण ६०७ हॉस्पिटलपैकी ४२० रुग्णालयांनी ‘ना- हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. मात्र, अजून १८७ रुग्णालयांनी प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. संबंधित रुग्णालयांना महापालिकेने नोटिसा पाठवूनही फायर ऑडिट सादर न केल्याने महापालिका संबंधित रुग्णालयांच्या इमारतींचा लवकरच वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करणार आहे. पूर्व पश्चिम विभागात १६४, सातपूर २७, नाशिक रोड ६६, सिडको ८५, पंचवटी ७७, तसेच विभागीय संदर्भ रुग्णालय अशा एकूण ४२० हॉस्पिटलने फायर ऑडिट करून घेतले आहे.

महापालिकेकडून नोटिसा

मास्टर मॉलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर आगीच्या चौकशीसाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. समितीने पाहणी केल्यानंतर कारवाई सुरू केली आहे. याशिवाय आता महापालिका अडचणीच्या व्यावसायिक इमारती, संस्था, हॉटेल व्यावसायिक, रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक ठिकाणांचे अग्निशमन दलाने फायर ऑडिट करून ‘ना- हरकत’ दाखला घेण्याचा नियम आहे.

आग विझविण्याचे दर

शहरात लागलेल्या आग विझविण्यासाठी दर आकारले जातात. शहरात मात्र नागरिक निवारण कर भरीत असल्यामुळे नागरिकांच्या घरांना आग लागल्यास पैसे मोजावे लागत नाहीत. मात्र, व्यावसायिक आस्थापना आणि संस्थांच्या आग विझविण्यासाठी महापालिका पैसे आकारते. त्यासाठी महापालिका हद्दीबाहेर २० किलोमीटर परिघात पहिल्या तासाला २ हजार रुपये, तर पुढील प्रत्येक तासासाठी १ हजार रुपये व ४० किलोमीटर अंतरावर पहिल्या तासाला ३ हजार रुपये, तर पुढील प्रत्येक तासाला १ हजार रुपये याप्रमाणे दर आकारण्यात येतात.

fire audit
विरगावपाडे परिसरात पावसाचा जोरदार दणका; शेतात साचले पाणीच पाणी

"अडचणीच्या ठिकाणी आग लागल्यास विझविण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. अशी अडचणीची ठिकाणे शोधण्यात येत आहे. वेळोवेळी आवाहन करूनही महापालिकेला प्रतिसाद न देणाऱ्या आस्‍थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी नोटिसा बजावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे." - संजय बैरागी, प्रभारी अग्निशामक अधिकारी

fire audit
Nashik : प्रारुप मतदार याद्यांची विक्री सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.