Nashik Water Cut : गंगापूर धरणातून थेट पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची युद्ध पातळीवर दुरुस्ती केल्यानंतर आता पाणी पुरवठा विभागासमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे.
गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राच्या सम्प दुरुस्तीसाठी ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. १५ व १६ नोव्हेंबर असे दोन दिवस दुरुस्तीचे काम सुरु राहणार असून शनिवारी पाणी पुरवठा पुर्वपदावर येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
५२ एमएलडी क्षमतेच्या गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात जागेची अडचण लक्षात घेवून सम्प उभारला नाही. या जलशुध्दीकरण केंद्राद्वारे चार जलकुंभ भरण्यात येतात. नाशिकरोड भागातही पाणी पुरवठा होतो. (Water supply to Nashik Road stopped on 16 17 November nashik news)
सद्य: स्थितीत अस्तित्वातील सम्प नवीन सम्प हाउस एम.एस.पाइपलाईनद्वारे जोडणे आवश्यक आहे. त्याकामासाठी ३६ तास लागणार असून १६ १७ नोव्हेंबरला नाशिकरोड व वडाळा भागामधील आठ प्रभागांमधील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे
गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा बंद
प्रभाग १७ : लोखंडे मळा, खर्जुल मळा, सप्तश्रृंगी नगर, शिवराम नगर, टाकळी रोड परिसर, इच्छामणी नगर, कॅनोल रोड, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसक गाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी नवरंग कॉलनी, वाघेश्वरी नगर व प्रभाग १७ मधील इतर परीसर.
प्रभाग १८ : शिवाजी नगर, मॉडल कॉलनी, अयोद्धा कॉलनी,पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर, वाघेश्रवर नगर, बालाजी नगर, भगवती लॉन्स परीसर, प्रभाग १८ मधील इतर परिसर.
प्रभाग १९ : गोरीवाडी, चेहडी परीसर, नाशिक पुना हायवे, एकलहरा रोड, सामनगाव आणि इतर परिसर.
प्रभाग २० : पुणारोड, डावखर वाडी, जय भवानी रोड, अश्विन कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव आणि इतर परिसर.
प्रभाग २१ : जय भवानी रोड, सहाणे मळा, लवटे नगर १ व २, रोकडोबा कॉलनी, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड आणि इतर परिसर.
प्रभाग २२ : विहितगाव, सौभाग्य नगर, लॉमरोड, वडनेर गाव परीसर, वडनेर रोड आणि इतर परिसर.
प्रभाग २३ : श्री श्री पंडीत रविशंकर मार्ग, पखाल रोड, खोडे नगर, निसर्ग कॉलनी, विधाते नगर, बँक कॉलनी, डीजीपी नगर, अशोका मार्ग, वडाळा रोड, जयदिप नगर, साईनाथ नगर, अमृत वर्षा कॉलनी, गणेशबाबा नगर, कल्पतरु नगर, आदित्य नगर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनुमा नगर, गोदावरी नगर, ममता नगर व इतर परिसर.
प्रभाग ३० : वडाळा गाव.
शुक्रवारी या भागात पाणी पुरवठा बंद
-प्रभाग १६ : उपनगर, शांतीपार्क, अयोध्या नगर, मातोश्री नगर, शिवाजी नगर, आर.टी वो कॉलनी तोरणा सोसा., समता नगर, टाकळी गाव, रामदास स्वामी, उत्तरा नगर, आदीवासी वाडा, जयभवानी नगर, पगारे मळा रामदास स्वामी नगर, श्रम नगर १ व २, सिंधी चाळ, इच्छामणी मंदीर परिसर, मकरंद कॉलनी, रघुवीर कॉलनी, आंबेडकर नगर, पंचशील नगर, राहुल नगर, शांती पार्क,पंजाब चाळ, रामदास स्वामी मठ, व इतर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.