येवला (जि. नाशिक) : एकीकडे पाऊस (Monsoon) लांबल्याने पेरणीचा खोळंबा झाला असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) देखील नागरिकांना टाहो फोडण्याची वेळ येत आहे. आजही तालुक्यात तब्बल ५३ गावे-वस्त्यांना वीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शहरासह ३८ गाव पाणीपुरवठा (Water Supply) योजनेला मात्र दिलासा मिळाला आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने दोन योजनांचे तलाव नुकतेच भरल्याने टंचाईचे संकट टळले आहे. (water tankers of 53 villages quench thirst Nashik News)
फेब्रुवारी-मार्चपासूनच तालुक्याला टँकरची गरज भासते तर जुनच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडला, की बहुतांशी टँकर हळूहळू बंद होतात. पावसामुळे जलस्रोतांची पाणीपातळी वाढून गावोगावच्या योजनांसह हातपंप, कूपनलिका व शेतकऱ्यांच्या जलस्रोतानाही पाणी येते, त्यामुळे टँकरची गरज भासत नाही. यावर्षी मात्र अद्यापही सर्वच जलस्रोत कोरडेच आहे. मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात उशिराने सगळ्यात पहिले ममदापूर येथे चार एप्रिलला टँकर सुरू झाला होता, तो अद्यापही सुरूच आहे.
जायदरे, आहेरवाडी, हडप सावरगाव, कोळगाव, आहेरवाडी, खरवंडी, भुलेगाव, कोळम, तळवाडे, देवदरी, आडसुरेगाव, पिंपळखुटे, कासारखेडे, पन्हाळसाठे, धनकवाडी, वसंतनगर, अंकाई सावरगाव, देवठाण, चांदगाव, नायगव्हाण, पांजरवाडी, सोमठाण जोश, नगरसूल राजापूर, सायगाव, वाघाळे, खामगाव, गारखेडे, बदापूर, रहाडी, भायखेळा या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहेत. ३० गावे व २३ वाड्यांना रोज शासकीय चार व खासगी सोळा अशा २० टँकरद्वारे रोज ५२ खेपा पाणीपुरवठा होत असून शहरातील नांदूर विहीरिवरून हे टँकर भरले जात आहेत. प्रत्येक टँकरला पंधरा ते तीस किलोमीटर पर्यंतचा प्रवास करून पाणी पोहोचावे लागत असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा टँकरवर सुरू आहे.
शहराला मिळाला दिलासा
दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाने तळ गाठल्याने पाणीटंचाईचे मलभ उभे राहिले होते.मात्र पाऊस लांबलेला असताना देखील पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळाल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.चार दिवस चाललेल्या या आवर्तनाने शहराच्या साठवण तलावात पुरेपूर पाणी भरून घेण्यात आले असून ३८ गाव योजनेलाही तलावात पाणी घेतले आहे.यामुळे पुढील दोन महिन्याचे टेन्शन दूर झाले असले तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र लागूनच आहे.साठवण तलावातील पाणी कमी झाल्याने उपाययोजना करण्यासाठी महिन्यापासून चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाऊस पडल्यावर यात बदल शक्य आहे.
"शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा आता तलाव भरून घेतल्याने टंचाईचे संकट दूर झाले आहे.मात्र घेतलेले पाणी पुढील दोन-तीन महिने पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे सध्या पाणीपुरवठ्यात बद्दल केला नसून आठवडाभरानंतर याच्यावर फेरविचार करू व परिस्थितीनुसार आढावा घेऊ." - नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.