Weather Forecast : अवकाळीसह गारपीट सोडेना पाठ; आजपासून 4 दिवस मध्यम सरींचा अंदाज

Weather Forecast
Weather Forecastesakal
Updated on

Weather Forecast : अवकाळीसह वादळी वारे आणि गारपीट ही नैसर्गिक आपत्ती जिल्हावासियांची पाठ सोडण्यास तयार नाही. आज सायंकाळनंतर शहर व परिसरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री विजांचा कडकडाट होत राहिला.

बुधवारपासून (ता. १२) चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Weather Forecast Unseasonal hailstorm Moderate showers forecast for 4 days from today nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Weather Forecast
Unseasonal Rain Damage : आम्हाला मदत द्या हो! आडगावच्या शेतकऱ्याची आर्त हाक

जिल्ह्यातील फलोत्पादनाला अवकाळी पावसासह वादळी वारा आणि गारपिटीने मोठा फटका दिला आहे. त्याचबरोबर बागायती क्षेत्रातील कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला या पिकांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे.

त्यामुळे अवकाळी कधी सुटी घेणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. अशातच, केंद्रातर्फे आज जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

नाशिककरांना विजांच्या कडकडाटाची चुणूक रात्री पाह्यला मिळाली. केंद्राच्या अंदाजानुसार येत्या चार दिवस आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच तापमान कमाल ३५ ते ३७ आणि किमान २० ते २२ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला ९ ते १७ किलोमीटर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Weather Forecast
Unemployed Youth Survey : बेरोजगार युवकांचे होणार सर्वेक्षण; राष्ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्यमातून प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()