नाशिक : जिल्ह्यात शनिवारपासून (ता. १८) पाच दिवसांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
तसेच आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान ३५ ते ३६, तर किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस राहण्याची आणि वाऱ्याचा वेग ताशी ८.३ ते ११.१ किलोमीटर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. (Weather Forecast weather in district expected to be dry and hot from today nashik news)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
कोरडे व उष्ण हवामान लक्षात घेऊन गहू, हरभरा, फळबागा व भाजीपाला पिकास पाण्याची पाळी द्यावी. वाटाणा पिकाची योग्यवेळी काढणी करावी. उन्हाळी भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण करावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी मंडप (दुधी भोपळा) व इतर पिकांसाठी ताटी पद्धतीचा वापर करावा. उन्हाळी भुईमूग पेरणीनंतर चाळीस दिवसापर्यंत पीक तणविरहित ठेवावे, त्यासाठी वेळोवेळी कोळपणी व खुरपणी करावी.
बागायती हरभऱ्यासाठी घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे, असा सल्ला इगतपुरीच्या विभागीय कृषी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.