Wedding Season: तुलसी विवाहाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वधू व वर पित्यांची आता आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा बार उडविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा लग्नाच्या तारखा भरपूर असल्याने लग्नसोहळ्यांचा धूमधडाका जोरदार राहणार आहे.
मात्र, काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीचाही परिणाम लग्नसोहळ्यांवर जाणवण्याची शक्यता आहे. तुलसी विवाहानंतर लग्नांचा धूमधडाका सुरू होतो. तुलसीविवाह नुकताच आटोपला. ज्यांचे लग्न जुळले, अशांनी आपसांत लग्नाची तारीख ठरविण्याचे काम सुरू केले आहे.
अनेक जण सध्या लग्न जुळविण्यासाठी धावपळ करत आहेत. ज्यांचा विवाह जुळला आहे, ते त्या तयारीत व्यस्त आहेत. (wedding celebrations are in full swing nashik news)
मंगल कार्यालय, घोडा, आचारी, पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारी सुरू आहे. त्यामुळे पुरोहितांनाही ‘बुकिंग’ मिळते. आचाऱ्यांसह मंगल कार्यालय मालकांनी वेगवेगळी पॅकेज जाहीर केले आहे. वधू-वरपिता आपापल्या ऐपतीनुसार पॅकेजची निवड करत आहे. मंगल कार्यालयांकडे ‘बुकिंग’ झपाट्याने होत आहे.
ज्यांच्या घरात मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे, ते पालक नातेवाइकांकडे असलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून, सोबत खिशात तयार केलेला बायोडाटा ‘रेडी’ असतोच. गप्पा-टप्पांमधून आपल्या मुलगा-मुलगीकरिता सुचविण्यासाठी चर्चा करतानाच खिशातील बायोडाटा काढत ‘पाहा, मग चांगलं स्थळ असेल तर सुचवा हं..!’ असे म्हणत नातेवाइकांकडे जबाबदारी सोपवत मदतीची अपेक्षा करत आहेत.
समाजासमाजांत परिचय ग्रुप
सध्या सोशल मीडियाचा वापर लग्न जुळविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे मुला- मुलीचा बायोडाटा व फोटो व्हॉट्सअॅपवर तयार झालेल्या समाजाच्या ग्रुपवर टाकत अपेक्षित स्थळांची चाचपणी केली जाते. त्यावर पसंत पडलेली स्थळे संपर्क क्रमांकावर पाठवत लग्न जुळविण्यासाठीबाबत चर्चा होते.
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वधू-वरांचा बायोडाटा व फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे. सोशल मीडियावर आवश्यक बाबी योग्य वाटल्या, तर संपर्क करीत थेट एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण देत विवाह जुळविण्याचे काम होते. त्यामुळे सोशल मीडिया लग्नासाठीचेही प्रभावी माध्यम ठरले आहे.
मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित
सोशल मीडियावरील विविध समाजांतील ग्रुपवरील बायोडाटावरील माहिती पाहता मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित असल्याचे दिसते. मुलींमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बी. फार्मसी, वैद्यकीय शिक्षण, प्राध्यापिका अशी स्थळे सर्वाधिक दिसून येतात. त्यात वय हा घटक येतो. उच्चशिक्षित मुलीसाठी त्या योग्यतेचा मुलगा अपेक्षित असल्याने पालक संशोधन करताना दिसतात.
त्यामुळे वय वाढताना दिसून येते. तर, मुलगा उच्चशिक्षित असला तरी तो ‘अॅडजस्ट’ करून लग्न जुळविण्याच्या मूडमध्ये असतो. कारण मुलींचे प्रमाण कमी दिसते. गरीब कुटुंबातील पालकही मुलीसाठी नोकरी असलेला वर शोधतो. शेतकरी पालकही मुलीला शेतकरी मुलगा नाकारतो. यामुळे कमी शिक्षित व शेतकरी किंवा साध्या व्यावसायिक मुलांना मुली मिळणे कठीण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.