काय घडले? जेव्हा हॉस्पीटलमध्येच झाले त्यांचे शुभमंगल सावधान..!

doctor wedding at covid.jpg
doctor wedding at covid.jpg
Updated on

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना अनेकांकडून साध्या पद्धतीने लग्न सोहळे केले जाताय. पण, नाही म्हटलं तरी कुटुंबीय अन्‌ नातेवाईकांचा गोतावळा होतोच. पण, मूळचे सातपूर परिसरातील डॉ. संदीप पुराणे व डॉ. शिवांगी यांनी चक्‍क असे केले ज्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

अनोख्या पद्धतीने विवाहगाठ बांधली

मुंबईतील केईएम रुग्णालयालगतच्या वसाहतीत सहकारी डॉक्‍टरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणारे सातपूर परिसरात वास्तव्यास असलेले डॉ. संदीप पुराणे व डॉ. शिवांगी यांनी अनोख्या पद्धतीने विवाहगाठ बांधली. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे एप्रिल महिन्यात होणारा विवाह टाळून आधी रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. मात्र साखरपुडा होऊन खूप दिवस झाल्याने घरच्यांकडून लग्नासाठीची विचारणा सुरू होती. मात्र विवाहाप्रमाणेच रुग्णांवर उपचार करणेदेखील महत्त्वाचे असल्याने डॉ. संदीप व डॉ. शिवांगी यांनी रुग्णालयातच विवाह करण्याचे ठरविले. डॉ. संदीप व डॉ. शिवांगी यांनी कुठलाही विधी न करता केईएम रुग्णालयातील कॉर्टरमध्येच पंधरा ते वीस डॉक्‍टरांच्या उपस्थितीत त्यांचा मेंदी व हळदीचा कार्यक्रम, तर बुधवारी (ता. 10) सकाळी कुटुंबीयांविना अत्यंत साध्या पद्धतीने विवाह पार पाडला. या वेळी रुग्णालयातील डॉक्‍टर्स सहकाऱ्यांच्या उपस्थित हा विवाह झाला. विवाहानंतर लगेच हे नवोदित दांपत्य पुन्हा कामावर रुजू झाले आहे. 


फेसबुक लाइव्हद्वारे कुटुंबीयांचा सहभाग 
अनेक अडचणींमुळे विवाह सोहळ्यात हजर राहाणे शक्‍य नसल्याने कुटुंबीय व नजीकच्या नातेवाइकांनी फेसबुक लाइव्हद्वारे या सोहळ्यात सहभाग नोंदविला. भरभरून लाइक्‍स आणि कमेंट्‌सच्या रूपाने या मंडळीने नवदांपत्याला आशीर्वादही दिला. 

रुग्णालयातच विवाह करण्याचा निर्णय
कोविड कक्षात काम करत असल्याने नाशिकला येणे शक्‍य नव्हते. त्यात कोरोना रुग्णांच्या सतत संपर्कात असल्यामुळे कुटुंबीयांना आमच्यामुळे कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनी रुग्णालयातच विवाह करण्याचा निर्णय घेतला. - डॉ. संदीप पुराणे, आर्थोपेडिक सर्जन 

रुग्णालयातील सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पूर्णत्वास आला. रुग्णांवर उपचार करणे हे महत्त्वाचे असल्यामुळे रुग्णालयातच विवाह करण्याचा निर्णय घेतला. - डॉ. हेमांगी देवराज  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.