नाशिक : शहरात कोरोनाची रुग्णसंख्या(corona patients in nashik) वाढण्याबरोबरच ओमिक्रॉन विषाणूची (omicron varient )भीतीही आहे. ३१ डिसेंबरनिमित्त होणारे कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. याबरोबरच या विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेत नागरिकांनी ३१ डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत आपल्या घरी साधेपणानेच करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निर्बंध रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत असल्यामुळे नऊच्या आत सेलिब्रेशन करता येणार आहे.
शहरात दर वर्षी मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जाते. मात्र, कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, आता कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरट्यावर असल्याने नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये हॉटेल चालकांनी नऊची डेडलाइन बघता मर्यादित स्वरूपात ऑफर्स नागरिकांना दिल्या आहेत. नऊच्या डेडलाइनच्या अनुषंगाने नागरिकांनीही त्या पद्धतीने नियोजन केल्याचे दिसत आहे. ३१ डिसेंबरची नागरिकांची गर्दी बघता गर्दीला नियंत्रित करण्याचे आव्हान हॉटेल चालक, प्रशासनापुढे आहे.
वीकेंडला होणार गर्दी
१ जानेवारीला शनिवार, रविवारची सुटी येत असल्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहराजवळ असलेल्या पर्यटनस्थळांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. तसे नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या कालावधीनंतर महाविद्यालय सुरू झाल्याने एकत्रित सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.