School Start : केंद्रीय प्राथमिक शाळा कंधाणे अंतर्गत असणाऱ्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सवात विविध उपक्रम राबविण्यात आले.
वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रभातफेरी काढून नवीन शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना आमंत्रित करून शाळेपर्यंत कार व बैलगाडीतून मिरवणूक काढून चिमुकल्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. (Welcoming newcomers to school in kandhane by taking out procession in cars nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चाळीस दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शाळांची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सदस्य व पालकांच्या हस्ते नवीन गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
प्रवेशोत्सवानिमित्त शाळा, वर्गखोल्यांना तोरण आणि रांगोळी काढून सजविण्यात आले. शिक्षकांनी शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिले पाऊल म्हणून त्यांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून घेण्यात आले.
तर काही शाळांमध्ये नवागतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच पहिल्या दिवशी शालेय पोषण आहारात मिष्टान्न देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रवेशोत्सव नवीन शैक्षणिक वर्षाची जल्लोषात सुरवात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.