लक्ष्मी आली हो! मुलगी झाली म्हणून बळीराजाचा आनंद गगनात मावेना; स्त्री जन्माचे लक्षवेधी  स्वागत

baby abort.jpg
baby abort.jpg
Updated on

नाशिक / अंदरसूल : मुलगी झाली म्हणून नाराज होणारा वर्ग आता खेड्यातसुद्धा राहिलेला नाही. याचीच प्रचीती गवडंगाव (ता. येवला) येथे दिसून आली. गवंडगाव येथील शेतकरी साईनाथ भागवत यांच्या कुटुंबात नुकत्याच दोन जुळ्या मुली दाखल झाल्या. आपल्याला झालेल्या दोन मुली आपली संपत्ती असून, वडील साईनाथ भागवत व मुलींची आई साधना भागवत यांनी जुळ्या मुलींचे जोरदार स्वागत करत स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने घरात स्वागत करून मुलगा-मुलगी असा भेद न करता समाजात एक चांगला संदेश दिला. 

जुळ्या मुली झाल्याने मुलींवर फुलांचा वर्षाव
दोन जुळ्या मुळी झाल्या म्हणून नाराज न होता गवंडगाव (ता. येवला) येथील या शेतकरी दांपत्याने आपल्या अभिज्ञा व अनुजा या नवजात लेकींचे गृहप्रवेश करताना मुलींची पावले कुंकूच्या पाण्यात ठेवून घरात आगमन केले. साईनाथ भागवत शेतकरी असून, शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना दहा वर्षांचा मुलगा असून, त्यानंतर त्यांना जुळ्या मुली झाल्याने त्यांनी मुलींचे फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. 

संपादन - ज्योती देवरे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.