Nashik Agriculture News : येसगाव परिसरात गव्हाचे पीक जोमात!

Wheat crop grown in village and locality
Wheat crop grown in village and localityesakal
Updated on

येसगाव (जि. नाशिक) : येथे व परिसरात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे नदी, नाले वाहिले. तसेच केटीवेयर, पाझर तलाव पाण्याने भरले. गिरणा नदी बऱ्याच दिवस वाहिली. त्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी उतरले.

पाण्याचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी रब्बीत गव्हाचे पीक घेतले. बऱ्याच ठिकाणी कांद्यासाठी ही निम्मे शेत सोडलेले होते. मात्र कांद्याचे रोप कमी पडले अशा उर्वरीत क्षेत्रात शेतकऱ्यांनी हरभऱयाचे पीक घेण्यात आले.

या भागात गहू पीक जोमात आहे. बऱ्याच भागात गहू पोग्यावर, ओंबीवर तर काही ठिकाणी हुरड्यावर आलेला आहे. (Wheat crop booming in Yesgaon area Nashik Agriculture News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Wheat crop grown in village and locality
Nashik News : पेठ- सुरगाणा सीमावर्ती भागातील गावांत मूलभूत सुविधांचा अभाव!

कांद्यापेक्षा गहू कमी पाण्यावर निघून येतो. कांद्याच्या भावात चढ उतार होत राहिला. मागील वर्षाच्या उन्हाळी भगव्याला पाहिजे तसा भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी निम्मे गहू व निम्मे उन्हाळी कांदा लावलेला आहे.

शेतकऱ्यांनी आजपर्यंत गहू पिकास पेरणी पासून तर हुरड्यावर येई पर्यंत वेळेवर पाणी, खते, निंदणी वेळेत केली. पोषक हवामान लाभल्यामुळे शिवारात गहू जोमाने वाढला आहे.

अद्याप काही पाण्याच्या दोन-तीन पाळ्या बाकी आहेत. गव्हाच्या पिकाला पाण्याची टच बसली तर गव्हाच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु यावर्षी गिरणा नदीला पाणी, तसेच तलावांना व इतर ठिकाणी पाणी टिकून राहिल्याने सर्वत्र गहू तरारला आहे.

गव्हाला चांगला बहर येण्यासाठी ऊन, थंडी पोषक ठरली आहे. शेतकरी आधुनिक पद्धतीने गव्हाचे पीक हार्वेस्टर मशीनने काढत असतो. त्यामुळे गव्हाच्या उंच वाढणाऱ्या जाती लावण्याकडे कल आहे.

Wheat crop grown in village and locality
Dhule News : महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नगरसेवक लोणावळा टूरवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.