Wheat Harvest : येसगाव परिसरात गहू काढणीला खोळंबा; शेतकऱ्यांना आता कडक ऊन पडण्याची प्रतिक्षा

Harvesting wheat with the help of a harvester machine
Harvesting wheat with the help of a harvester machineesakal
Updated on

येसगाव (जि. नाशिक) : गावच्या दक्षिण व उत्तर भागात मार्चपासून गहू काढणीस वेग आला होता. मात्र ढगाळ वातावरण व पडलेल्या पावसामुळे गहू काढणी आठवडाभर लांबण्याची चिन्ह दिसून येत आहे. यामुळे कडक ऊन पडण्याची शेतकरी प्रतिक्षा करीत आहे. (Wheat Harvest Stop wheat harvesting in Yesgaon area Farmers now waiting for hot weather nashik news)

यंदा रब्बीचा हंगाम जोरात आहे. अनेक भागात हार्वेस्टर यंत्राच्या साह्याने गव्हाची काढणी झाली असून उर्वरित भागात काढणी बाकी आहे. मागील दोन-तीन दिवस पावसाच्या सरी पडल्यामुळे गव्हाच्या लोंबामध्ये पाणी शिरल्याने लोंबा ओल्या झाल्या आहेत.

त्यामुळे गव्हाची काढणी आठवडाभर लांबली आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील काही दिवस जिल्ह्यात वादळ, पाऊस, गारा येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उर्वरित राहिलेला गहू, हरभरा, कांदा हे पीक अद्याप शेतात उभे असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ओल्या लोंबा मधून गव्हाचे दाणे सुटत नाहीत. म्हणून कडक ऊन आवश्यक आहे. लागवड क्षेत्रात विहिरीच्या चांगल्या पाण्यामुळे तसेच चांगले हवामान लाभल्यामुळे गहू लागवड क्षेत्र वाढले होते, काहींनी कांद्याच्या ठिकाणी गव्हाला पसंती दिली होती.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Harvesting wheat with the help of a harvester machine
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने धास्तवला बळीराजा; हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरवला जाणार?

परिसरात पंजाब, हरियाना, कर्नाटक राज्यातून हार्वेस्टर यंत्र दाखल झाली आहेत, हार्वेस्टर दिवसाला सरासरी ३०-३५ एकर गहू कापून पोत्यात भरतो. यामुळे आठवड्याचे काम काही तासात होते. यंत्राची क्षमता जास्त असल्याने एका दिवसात गहू घरात येतो. मात्र ढगाळ हवामानामुळे आता गहू काढणीला उशीर होत असल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे.

"शेतामध्ये गहू, हरभरा, कांदा रब्बीचे पिके आहेत. ढगाळ वातावरणामुळे व पावसाचे चिन्ह दिसत असल्यामुळे तोंडी आलेला घास हिरावून घेतो की काय? अशी चिंता लागली आहे. मार्च महिन्यात कडक ऊन असते त्यामुळे पिके काढणी सोपे जाते. परंतु आता वातावरण निवळण्याची वाट पाहत आहोत."- एस.डी.शेलार, शेतकरी, येसगाव खुर्द

Harvesting wheat with the help of a harvester machine
Nashik News: म्हाळदे व सायने घरकुल प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी; महानगरपालिका प्रशासनामागे चौकशीचा ससेमीरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.