नाशिक : जिल्हा परिषदेचा विविध विभागांतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षातील निधी खर्चासाठी लगबग सुरू आहे. मात्र, निधी खर्चाचा वेग अत्यंत कमी असल्याने १५ दिवसात एक टक्काच निधी खर्च झाला आहे.
अद्यापही १०० कोटींचा निधी खर्च झालेला नसल्याचे समोर आले आहे. हा निधी खर्चासाठी जिल्हा परिषदेकडे फक्त ३३ दिवसांचा कालावधी असून यातील सुट्या वगळल्यास २५ दिवस शिल्लक आहेत.
या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चाचे जिल्हा परिषद प्रशासनासमोर आवाहन उभे आहे. निधी खर्चाचा वेग कमी झाल्याने आता पालकमंत्री दादा भुसे जिल्हा परिषदेच्या निधी खर्चाचा आढावा घेणार आहे. (When will funds of one hundred crores spent Guardian Minister Dada Bhuse will review expenditure Nashik ZP News)
२०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या विकास कामांच्या निधी खर्चासाठी ३१ मार्च २०२३ अखेरची तारीख आहे. या आर्थिक वर्षातील आतापर्यंत ७८ टक्के निधी खर्च झाला असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र विविध विभागांचा तब्बल १०० कोटींहून अधिक निधी खर्च झालेला नसल्याचे समोर आले.
निधी खर्चासाठी वारंवार आढावा होत असतानाही मागील १५ दिवसात निधी खर्चाचा वेग मंदावला आहे. लेखा व वित्त विभागाकडून निधी खर्चासाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु, विभागांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे बघावयास मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या सतत बैठकांचे सत्र सुरू आहे. गत आठवड्यात प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत मिशन १०० आदर्श शाळा विकसित करणे कार्यशाळा, सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा झाला.
त्यापाठोपाठ भगीरथ प्रयास अभियानातंर्गत कामांचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रमानंतर लागलीच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामांचे उद्घाटन पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंत्रणा व्यस्त असल्याने निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
आठवडाभराचा विचार केल्यास दोन कार्यक्रम, चार बैठका झाल्या. त्यामुळे विभागात बसून फाईली कधी काढणार असा प्रश्न अधिका-यांकडून उपस्थित होत आहे. निधी खर्चासाठी केवळ ३६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दिवसात हा निधी खर्च कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. निधी वेळात खर्च व्हावा यासाठी आता पालकमंत्री भुसे बैठक घेऊन आढावा घेणार आहे.
पालकमंत्र्यांनी टोचले कान
भगीरथ प्रयास अभियानातंर्गत कामांचा शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना त्यांचे कानही टोचले. जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम असून त्यासाठी कार्यक्रम होत आहे.
सतत कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याचे बोलून काम कधी करणार असे अप्रत्यक्ष त्यांनी बोलून दाखविले. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांमुळे निधी खर्चाकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत पत्रकार परिषदेत पालकमंत्री भुसे यांना विचारले असता त्यांनी निधी खर्च करणे महत्त्वाचे आहे.
त्याकडे देखील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. विकास कामांचा निधी वेळात खर्च होणे आवश्यक असून त्यासाठी बैठक घेणार असल्याचे भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.