लखमापूर : दिंडोरी-पेठ मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ४५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळविली. त्यामुळे मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या.
मात्र, खड्ड्यांच्या रस्त्यातून जनतेची कधी सुटका होणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. (When will public get rid of potholes Funds sanctioned for Dindori Peth taluka but work still awaited Nashik)
दिंडोरी-पेठ तालुक्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या, परंतु निधीअभावी रखडलेल्या निधीची तरतूद होण्याची, तसेच उर्वरित रस्त्यांच्या कामांना हिवाळी अधिवेशनात निधी मिळण्याची अपेक्षा होती.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या नियोजनातून दिंडोरी-पेठ मतदारसंघातील १६० कामांना ४५० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली. मात्र, अनेक वर्षांपासून रस्त्यांची झालेली दुरवस्था कधी संपणार, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
दोन महिन्यांमध्ये रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आमदारांपुढे आहे. कामे सुरू झाल्यास रस्त्याच्या कामांचा दर्जा महत्त्वाचा विषय आहे. अधिकारी व ठेकेदारांवर नियत्रंण राहिलेले नाही.
यासाठी श्री. झिरवाळ यांना मवाळ भूमिका सोडून कडक भूमिकेत यावे लागणार आहे. थोडक्यात अधिकारी व ठेकेदारावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. दुसरीकडे ४५० कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे सोशल मिडियावर अभिनंदन केले जात आहे.
जुन्या कामांना निधीची तरतूद, वीज केंद्र, रखडलेले ओझरखेड पर्यटनस्थळ, वळण योजना, वणीचे ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित होण्यासाठी निधीची तरतूद होण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात बहुतांशी कामांना मंजुरी मिळाली असून, विकासकामे लवकरात लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे.
दिंडोरी तालुक्यात पर्यटनस्थळ मंजूर होत काम सुरू झाले. अद्याप ते पूर्ण झालेले नाही. प्रत्येक अधिवेशनात उर्वरित कामास मंजुरी येते. मात्र, निधीअभावी काम ठप्प आहे. ट्रॉमा केअरची इमारत उभी राहिली.
मात्र, अद्याप पदनिर्मिती झालेली नाही. चिमणपाडा वळण योजना मंजूर झाली आहे. अजून काम सुरू नाही. मांजरपाडा व विविध वळण योजनांचे काही कामे अपुरे आहेत, त्यासाठी निधी अपेक्षित आहे.
नाशिक-कळवण रस्त्याचे चौपदरीकरण होण्याची अपेक्षा आहे. तळेगाव अक्राळे औद्योगिक वसाहतीत रिलायन्स व इंडियन ऑईलचे प्रोजेक्ट सुरू असून, अजून नव्याने उद्योग येण्याची अपेक्षा आहे.
जांबुटके आदिवासी औद्योगिक क्लस्टरला मंजूरी मिळाली असून, तेथे उद्योग सुरू होण्याची अपेक्षा आहे. पूर्वी मंजूर व नुकतेच मंजूर झालेल्या विकासकामांची टेंडर प्रोसेस पूर्ण होत लवकर कामे सुरू होणे गरजेचे आहे.
"पावसाळी अधिवेशनातील मंजूर कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नव्याने रस्ते, पूल आदी सुमारे १६५ विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. अजूनही काही कामांना वेगवेगळ्या योजनेतून मंजुरी मिळणार आहे. सर्व कामे तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. वीजप्रश्न सोडविण्यासाठी वाढीव वीज केंद्र, वळण योजना, बंधारे, औद्योगिक वसाहत आदींचे कामे मार्गी लावले जातील. सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे."
-नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.