नाशिक : नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून पावणेदहा लाखांचा दंड वसूल

पूर्व विभाग घनकचरा विभागाकडून आठ महिन्यांत दंडात्मक कारवाई
fine
finenaSHIK
Updated on

जुने नाशिक : कोरोनासह(corona) विविध शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून सुमारे पावणेदहा लाखांचा दंड वसूल करण्यात आली. पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाकडून गेल्या आठ महिन्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोना प्रादुर्भाव आणि शहर स्वच्छता निमित्ताने सरकार तसेच महापालिकेकडून(nashik carporation) काही नियम करण्यात आले आहे. बहुतांशी नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे स्वतःसह इतरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. कोरोना प्रादुर्भावामुळे स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्यात येत होते. यासाठी मास्कचा(mask) वापर करणे, प्रादुर्भाव टाळण्यासाठी शारिरिक अंतर राखणे, प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत आस्थापना बंद करणे यासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे अशा विविध प्रकारचे नियम करण्यात आले आहे. त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडून करण्यात आले होते. नागरिकांनी मात्र याकडे दुर्लक्ष करत सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली.

fine
इथेनॉलसाठी योजनाबद्ध कार्यक्रम हवा : शरद पवार

पूर्व विभागातील अशा नागरिक आणि व्यावसायिकांवर विभागाच्या घनकचरा विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांनी त्यांचे सहकारी कर्मचाऱ्‍यांसह विभागाच्या विविध भागातील शासकीय नियम मोडणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांवर १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२१ अशा गेल्या आठ महिन्यात दंडात्मक कारवाई करत सुमारे ९ लाख ७५ हजारांचा दंड वसूल केला. त्यात नियमबाह्य आस्थापना खुले ठेवणाऱ्या व्यावसायिकांकडून सर्वाधिक ३ लाख ६५ हजार त्यापाठोपाठ मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ३ लाख ५८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

fine
वाहतूककोंडीने चालकांचे हाल

असा करण्यात आला दंड; कारवाईचे स्वरूप पावत्यांची संख्या दंड

  1. मास्क न वापरणे ७८२ ३ लाख ५७ हजार ५००

  2. सामाजिक अंतर न पाळणे २२ १ लाख ७० हजार

  3. नियमबाह्य आस्थापना खुले ठेवणे ७६ ३ लाख ६४ हजार ५००

  4. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २६ २६ हजार

  5. नदी नाल्यात कचरा टाकणे ०१ १५ हजार

  6. रस्त्याच्या कडेला कचरा टाकला ३३ १७ हजार ९२०

  7. पाळीव प्राणीने रस्त्यावर घाण केली ०४ ८००

  8. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली १० २ हजार

  9. सार्वजनिक ठिकाणी शौच केले प्रकरणी ०१ ५००

  10. जैविक कचरा उघड्यावर फेकणे ०१ २० हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()