कसबे सुकेणे (जि. नाशिक) : लाल कांदा मार्केटमध्ये सुरू असतानाच उन्हाळ कांदाही मार्केटमध्ये येऊ घातल्याने कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत सरासरी कांद्याचे भाव तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न जिल्हा शेतकरी संघटनेने राज्य व केंद्र सरकारला विचारला आहे. जिल्हा शेतकरी संघटनेने मायबाप सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करा व कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export) वाढवून किमान प्रतिक्विंटल 2500/- रुपये भाव जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
या वर्षी लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावाबाबत मोठी आशा असून, खऱ्या अर्थाने उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येणे बाकी असतानाच कांद्याचे भाव गडगडले, हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे.
कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोरोना संकटाचा मोठा सामना करत महागडे कांद्याची बियाणे, कांदा लागवडीत झालेला भरमसाट खर्च, खते व औषधांचा वाढलेल्या भरमसाट किमती व कांदा काढणीचा मोठा खर्च आतापर्यंत करीत आहे. मात्र, कांद्याची काढणी आल्याबरोबरच कांद्याचे भाव कोसळणे हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणे हे राज्य व केंद्र सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे.
आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू राज्य व केंद्र सरकारकडे लावून धरणे गरजेचे असून, कांद्याच्या किमती अशाच कमी होत राहिल्या, तर कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने (Central and State Government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मायबाप होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
"लाल कांदा अद्यापही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असतानाच उन्हाळ कांदाही मार्केटमध्ये येण्यास सज्ज झाला आहे. सर्व शेतकरी उन्हाळ कांदा साठवू शकत नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाने (Central and State Government) दिलासा देऊन हमीभाव जाहीर करावा".
-अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.