पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेचे (Pradhan Mantri Jeevanjyoti Yojana) सदस्य, विमाधारक पतीचे निधन होऊन सव्वावर्ष उलटले, पण देना बॅंकेने अद्यापपर्यत विम्याच्या रक्कमेचा लाभ दिलेला नसल्याने विधवा महिला स्वप्नाली घोडके या मानसिक तणावाखाली आहेत. अनेकदा बॅंकेत जाऊन चौकशी केली, पण अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेणारी उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळाली. याउलट पतीच्या नावावर असलेल्या गृहकर्जाच्या वसुलीचा जोरदार तगादा देना बॅंकेकडून सुरू आहे.
सिध्देश्वर या मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने वडील सूर्यकांत घोडके यांचेही त्याच दिवशी निधन झाले. दोन कर्ते पुरूष गमावल्याने घोडके परिवारावर आभाळ कोसळले. त्याचेवळी पत्नी स्वप्नाली घोडके यांना पतीने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा देना बॅंकेतून उतरविला असल्याचे लक्षात आले. गृहकर्जाचा बोजा दूर होईल या अपेक्षने देना बॅंकेत विम्याची रक्कम मिळण्यासाठी निर्धारीत वेळत दावा दाखल केला.
उलट गृहकर्जाचा तगादा...
विम्याची रक्कम मिळावी यासाठी स्वप्नाली घोडके या गेल्या सव्वा वर्षापासून देना बॅंकेचे उंबरे झिजवत आहेत. विविध कारणे देऊन देना बॅंकेचे अधिकारी घोडके यांना तिष्टत ठेवत आहे. पंतप्रधानाच्या नावाने असलेल्या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलेची थट्टा सुरू आहे. दुसरीकडे सिध्देश्वर घोडके यांनी घेतलेल्या गृहकर्जासाठी पठाणी तगादा बॅंकेकडून सुरू आहे. यामुळे स्वप्नाली घोडके मानसिक तणावात आहे.
"सव्वा वर्षभरापासून मी व माझे दीर योगेश घोडके हे बॅंकेकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी विनंती करतो आहे. पण प्रत्येक वेळेला कारण देऊन आम्हाला माघारी पाठविले जाते. विम्याची रक्कम तर मिळत नाही मात्र गृहकर्ज वसुलीसाठी आमचा बॅंकेच्या खासगी एजन्सीकडून छळ सुरू आहे."
-स्वप्नाली घोडके, पिंपळगाव
"घोडके यांच्या विम्याच्या दाव्यात काही त्रुटी होत्या. नंतर सर्व्हरला तांत्रिक अडचणी आल्या. येत्या महिन्याभरात त्यांची विम्याची रक्कम दिली जाईल."
-मालती जाधव, अधिकारी, देना बॅंक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.