Nashik Crime: प्रसुतीसाठी ‘सिव्हिल’मध्ये आली अन्‌...; पतीविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल

rape Crime
rape Crimeesakal
Updated on

Nashik Crime : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या विवाहिता अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्याने, तिच्या पतीविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमधील अशाप्रकाराचा हा दुसरा प्रकार घडला आहे. यामुळे बालविवाह आळा बसल्याच्या शासनाने केलेला दावाच फोल ठरला आहे. दरम्यान, प्रसुतीसाठी आलेल्या अल्पवयीन विवाहितेने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. (wife came to Civil hospital for delivery case of rape registered against husband under POCSO Nashik Crime)

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता अल्पवयीन असतांनाही तिचा गेल्या वर्षी संशयिताशी विवाह पार पडला. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी तिला दाखल करण्यात आले.

त्यावेळी पीडितेच्या कागदपत्रांच्या पडताळणीतून ती अल्पवयीन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. प्रसुतिदरम्यान अल्पवयीन मातेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rape Crime
Dhule Crime News : इच्छेविरुद्ध गर्भपात करताना युवतीचा मृत्यू; डॉक्टरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी संशयित पती याच्याविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

दरम्यान, समाजातील बालविवाहांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना, गेल्या काही दिवसात दोन घटना अशाप्रकारे उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शासनाचा दावा फोल ठरतो आहे.

rape Crime
Nashik Crime News : पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडून 28 लाखांची चोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()