Nashik Crime: पत्नीच्या प्रियकरानेच काढला ‘त्याचा’ काटा

Murder
Murderesakal
Updated on

Nashik Crime : पंचक आठ दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा गोदावरी नदीकिनारी असलेल्या मनपा मलनिस्सारण केंद्राजवळील निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला.

मयत युवकाचा खून त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी संशयित पत्नी, तिचा प्रियकर व दोघा साथीदारांना अटक केली आहे. (Wifes lover killed husband at panchak Nashik Crime)

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (३०, रा. पंचक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गायकवाड याचा भांडी विक्रीचा व्यवसाय होता. ३ सप्टेंबरला ज्ञानेश्वर घरून जेवण तयार करून मित्रांना भेटण्यासाठी ते जेवण घेऊन गेला होता.

परंतु तो परतलाच नाही. याप्रकरणी त्याची पत्नी साधना गायकवाड हिने नाशिक रोड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांकडून ज्ञानेश्वरचा शोध सुरू असताना सोमवारी (ता. ११) दुपारी पंचक गावातील सोमनाथ बोराडे यांना मनपा मलनिस्सारण केंद्राजवळ एक बेवारस कुजलेला मृतदेह आढळून आला.

त्यांनी याची माहिती पंचक ग्रामस्थांसह नाशिक रोड पोलिसांना दिली‌. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक निरीक्षक हेमंत फड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेथे पालापाचोळ्याखाली मृतदेह मिळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Murder
Nashik Crime: सराईत गुन्हेगार व्यंक्याचा मुक्काम हलेना

सखोल तपासात मृतदेह ज्ञानेश्वरचा असल्याचे स्पष्ट झाले. ज्ञानेश्वरच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्याने तो घातपाताचा प्रकार असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता पत्नी साधनाच्या जबाबात तफावत आढळून आली.

त्यामुळे पोलिसांनी संशयावरून साधना व तिचा प्रियकर कार्तिक मोरे याच्यासह दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत संशयितांनी खुनाची कबुली दिली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder
Jalgaon Bribe Crime : पारोळा पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक लाचेच्या जाळ्यात; अटक न करण्यासाठी घेतले 8 हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.