Wildlife Organ Sale Case : झटपट श्रीमंतीसाठी तरुणाकडून कातडी विक्रीचा डाव

criminal arrested in wildlife organ selling case
criminal arrested in wildlife organ selling caseesakal
Updated on

नाशिक : बिबट कातडीची विक्री करणाऱ्या संशयित यांना न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली.

झटपट श्रीमंत होण्यासाठी संशयित यांनी वन्यजीव अवयव विक्रीचा डाव आखला होता. यात एक संशयित हा वनविभागातील कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे. हे सर्व संशयित उच्चशिक्षित आहे. यांच्यासह या कटात सहभागी असलेल्या इतर तिघांचा शोध वनविभागाच्या पथकाकडून घेतला जात आहे. (Wildlife organs Sale Case Involvement of son of Forest Department employee Nashik Latest Marathi News)

नाशिक वनपरिक्षेत्राची अधिकारी विवेक भदाणे यांना मिळालेल्या माहिती नुसार शहरातील तरुणांकडे एक बिबट कातडी विकण्यासाठी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भदाणे यांनी कातडी विक्री करणाऱ्यासह सोबत संपर्क करत कातडी खरेदीची तयारी दर्शविली.

त्यानंतर कृषीनगर जॉगिंग ट्रक जवळील सायकल सर्कल जवळ वनविभागाच्या पथकातील वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक सचिन आहेर, ज्ञानेश्‍वर शिंदे, उत्तम पाटील, गोविंद काळे, राजेंद्र ठाकरे, गणेश सत्रे, प्रकाश साळुंखे, वनसेवक पांडुरंग भोये, अशोक खानझोडे, सुनील खानझोडे, अंबादास जगताप, इको-इकोचे वैभव भोगले, अभिजित महाले यांच्या साहाय्याने याठिकाणी सापळा रचल्यानंतर बिबट कातडीची विक्री करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक करत त्यांच्याकडून आणखी एका संशयितासह चिंकारा आणि निलगायीची शिंगे आणि चार मोबाईल जप्त केले.

यावेळी या तिघांकडे केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आले असून यात आणखी तिघांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हे तिघेही उंटवाडी, सातपूर आणि कॉलेज रोड भागात राहतात.

१५ ते २० वर्ष जुनी कातडी

सदर विक्रीसाठी असलेली बिबट कातडी ही सुमारे १५ ते २० वर्ष जुनी आहे. ती नक्की किती जुनी आहे यासाठी प्रयोगशाळेत पाठविली जाणार आहे. सदरची कातडी व शिंगे हे या संशयितांकडे कशी आली याचा चौकशी केली असता त्यांनी ती चोरली असल्याचा दावा करण्यात आला आहे. संशयितांनी कोणाकडून कातडी खरेदी केली याबाबत उकल झालेली नाही.

यातील एका संशयित हा वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा मुलगा असून एकाच्या वडिलांचा ट्रान्स्पोर्ट तर एकाचे काका हे पोलिस दलात आहे. त्यामुळे या गुन्ह्यात विभागातील इतरांचा त्यादृष्टीने देखील तपास होवू शकतो. तिघा संशयित पैकी एकाचे वय २९ तर इतर दोघांचे वय २० वर्ष आहे.

criminal arrested in wildlife organ selling case
शहरात 15 ठिकाणी Charging Point; Smart City कंपनीच्या माध्यमातून स्टेशन

सकाळपासून ठिकाणांमध्ये बदल

सदरची कातडी ही विक्रीसाठी संशयित यांच्याकडून २० लाख रुपयांची ऑफर दिली जात होती. यासाठी पाच महिन्यापासून ते ग्राहक शोधत होते. विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचा देखील वापर केला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली असता ते दोन दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होते.

श्री. भदाणे यांनी कातडी खरेदीसाठी संपर्क साधला असता त्यांनी चार लाख रुपयांमध्ये सौदा ठरविला. त्यानंतर कातडी पाहण्यासाठी त्यांनी आग्रह केला असता २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेची वेळ त्यांना सांगितली. त्यानंतर या संशयित यांनी शहरातील महात्मानगर येथे बोलाविले.

त्यानंतर त्यांनी याठिकाणी शासकीय वाहनाचा संशय आल्याने त्यांनी वेळोवेळी ठिकाण बदलत महात्मानगर नगर नंतर जेहान सर्कल, प्रसाद सर्कल, विद्याविकास सर्कल, कॉलेज रोड अशी ठिकाणी बदलल्यानंतर कृषीनगर जॉगिंग ट्रक जवळ कातडी विक्रीसाठी सायंकाळी पाचला कातडी दाखविली. त्यानंतर पथकाने त्यांना याठिकाणी रंगेहाथ पकडले.

"वन्यजीवांसह त्यांच्या अवयवांची खरेदी-विक्री ह्यास कायद्यान्वये बंदी आहे. मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी आता तरुणांकडून असा प्रकार घडत आहे. वन कायद्यान्वये हे अतिशय गंभीर गुन्हे असून, यात मोठी शिक्षा आहे. त्यामुळे कोणीही अंधश्रद्धा पोटी किंवा हौसीपोटी वन्यजीवांची अवयवांची खरेदी विक्री करू नये. यापुढे असे आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे." - विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक पश्‍चिम विभाग.

criminal arrested in wildlife organ selling case
PFIच्या दोघांना ATSकडून अटक; 20 जणांना घेतले ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.