NMC News : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. महापालिका मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात गुरुवारी (ता. २७) बैठक झाली. (Will solve the problems of sanitation workers NMC Commissioner Dr Pulkundwar nashik news)
बैठकीत साफसफाई ठेकेदारी पद्धत त्वरित बंद करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावे, १९८५ च्या शासन निर्णयानुसार सफाई कामगार राहत असलेली घरे मालकी हक्काने त्यांच्या नावावर करून द्यावी, वाढती लोकसंख्या पाहता त्वरित सफाई कामगार भरती करावी,
सफाई कामगारांचा विमा उतरवावा, महापालिकेची बेकायदेशीर निवड समिती व घर निवड समिती त्वरित रद्द करावी, लाड व पागे समितीच्या नियमाची त्वरित अंमलबजावणी करावी, औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार सफाई कामगारांच्या बेकायदेशीर केलेल्या बदल्या रद्द करून त्यांना थकीत वेतन द्यावे,
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सफाई कामगारांना कुंठित वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, सफाई कामगारांना हजेरी शेड उपलब्ध करून द्यावे, झाडू, हातमोजे, सफाईचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, सफाई कामगारांना पूर्वी प्रमाणे गणवेश, चप्पल, गमबूट, रेनकोट द्यावे आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे, सफाई कर्मचारी विकास युनियनचे अध्यक्ष सुरेश दलोड, कार्याध्यक्ष सुरेश मारू, रमेश मकवाना, अमित चव्हाण, राजेंद्र कल्याणी, देवेन मारू आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.