Nashik News : गायकवाड कुटुंबीयांचे दुःख ह्रदयाला ठेच पोहोचवणार होतं..धुळगाव येथील हरण्या हा कुटूंबाचा सदस्य असलेला बैल गेल्याने गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पन्नासहून अधिक शर्यती जिंकलेला हरण्या आजारपणाच्या शर्यतीत अखेर हरला. (Winning fifty race harnya bull died farewell from Gaikwad family Nashik News)
धुळगाव येथील नवनाथ व प्रवीण गायकवाड यांचा हरण्या बैल गेल्या पाच वर्षांपासून कुटुंबीयांचा गाडा ओढत होता. हरण्याला अचानक श्वसनलिकेमध्ये आजार झाला. गायकवाड कुटुंबीयांनी त्याच्या उपचारासाठी अतोनात प्रयत्न केले.
आपल्या लाडक्या बैलाच्या आजारावर जवळपास ५० ते ६० हजार रुपये खर्च केला. अनेक नामवंत पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया केल्या, परंतु शस्त्रक्रिया दरम्यानच हरण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना कळताच येथील गायकवाड कुटुंबीय तसेच बैलगाडा शर्यतीमधील शर्यतपटू यांना या हरण्याच्या निधनानंतर धक्का बसला. आतापर्यंत एकही बैलगाडा शर्यतीची लढत न हरलेला हा हरण्या बैल आजारात गेल्याने सर्वांनाच दुःख झाले आहे. हरण्या बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गायकवाड कुटुंबीयांनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
बैलगाडा शर्यतीत अनेक विक्रम करत पन्नासहून अधिक शर्यती हरण्याने जिंकल्या आहेत. बैलगाडा शर्यतीत अगदी कमी वेळात धावण्याचे हरण्याने अनेक विक्रम केले. त्यामुळे पंचक्रोशीत हरण्या प्रसिद्ध झाला.
तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीत फायनल सम्राट म्हणून तो सुपरिचित झाला होता. त्याने अनेक बक्षीसे मिळविली आहेत, त्यामुळे हरण्या आमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील असे गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.