Winter Food : पौष्टिक डिंक अन् मेथीचे लाडू तेजीत; थंडीत ऊर्जा संवर्धनासाठी आहारामध्ये समावेश

Methi Laddu
Methi Ladduesakal
Updated on

पल्‍लवी कुलकर्णी- शुक्‍ल : सकाळ वृत्‍तसेवा
नाशिक, ता. १ : सर्व ऋतूंमधील आरोग्यदायी ऋतू हेमंत. हेमंत ऋतूत पचनशक्तीत वाढ होते, त्यामुळे भूक वाढते. शरीरातील ऊर्जा खर्च होत असल्याने उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. त्यासाठी म्हणून नाशिकमधील घराघरांमध्ये पौष्टिक डिंक आणि मेथीचे लाडू तयार होत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे या लाडूंसाठी लागणाऱ्या पदार्थांची बाजारपेठ सध्या तेजीत आहे. (Winter Food Nutritious gum fenugreek laddu making started in winter Inclusion in diet for energy conservation in winter Nashik news)

थंडीमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती उच्च असते. थंड हवेच्या संरक्षणार्थ शरीरातील ऊर्जा आणि अग्नीचे प्रमाण वाढते. त्यामुळे आजारांपासून संरक्षण होते. शरीर स्वस्थ राहते. गुलाबी थंडी, हलकी व आल्हाददायक हवा यामुळे सर्व ऋतूत उत्तम ऋतू हेमंत कडे पाहिले जाते. सुदृढ शरीरासाठी जॉगिंग, व्यायाम आणि नाष्ट्यात स्निग्ध पदार्थयुक्त डिंक, मेथीचा लाडू, तर जेवणात उष्‍ण पदार्थांचा समावेश असतो. हेमंत ऋतूतील आहारात उडीद डाळीचे लाडू, उसापासून बनवलेले गोड पदार्थ (जसे की गूळ), नवीन तांदळाचा भात समाविष्ट केला जातो.

पौष्टिक लाडूतील डिंक, गोडंबी, आळीव हे उष्‍ण व हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्‍त असतात. त्‍यामुळे कंबरदुखी, सांधेदुखी यापासून संरक्षण मिळते. बदाम, काजू, अक्रोड जीवनसत्त्वयुक्त पदार्थ, खसखस डोळ्यांसाठी पर्यायाने दृष्‍टीस उपयुक्‍त ठरते. शरीराच्या शक्‍ती वृद्धीला मदत होते. याच पार्श्‍वभूमीवर सुकामेव्याचे भाव दिवाळीच्या तुलनेत स्थिर असल्याने खरेदीकडे कल वाढला आहे. सुकामेवा व किलोचे दर रुपयांमध्ये असे : खोबरे- १८०, खारीक- २००, डिंक- साधा २४० आणि बाभळीचा ४००, मेथी- १६०, काजू- ८००, बदाम- ७२०, गोडंबी- ९६०, अक्रोड- ९६०, अंजीर- ७२०, खसखस- २ हजार, गूळ- ६०, जर्दाळू-४८०, पिस्ता- १ हजार १२०, किशमिश- २००, काळा मनुका- ४००, आळीव-४००.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Methi Laddu
Talathi Recruitment : राज्यात 4 हजार तलाठी पदांची भरती; 3 हजार पदे नव्याने मंजूर

स्निग्ध पदार्थांचे सेवन फायदेशीर

गोरसानिक्षुविकृतीर्वसां तैलं नवौदनम |
हेमन्तेभ्‍यस्‍यतस्‍तोयमुष्‍णं चायुर्न हीयते ||

अर्थात, हेमंत ऋतूत दुधाचे पदार्थ, उसापासून बनलेले पदार्थ, स्‍निग्‍ध पदार्थांचे सेवन केले पाहिजे. स्‍नानासाठी व पिण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग आयुवृद्धीसाठी लाभदायक आहे.

"सुकामेव्याच्या किमती दिवाळीच्या किमतीपेक्षा कमी झाल्‍याने बाजारपेठेत सुकामेवा खरेदीचा उत्साह ग्राहकांमध्ये आहे. हेमंत ऋतूत शरीराचे पोषण व वाढ यासाठी पौष्टिक लाडूस महिलांचे प्राधान्य आहे. लाडू बनविण्यासाठी महिलांची तयारी सुरू झाली आहे."

- संतोष उग्रेज, सुकामेवा विक्रेता

Methi Laddu
Nashik News : पर्यटकांना आकर्षित करतेय मोहनदरीची ‘नेढ’; निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()