जुने नाशिक : गेल्या दोन दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढल्याने उबदार कपड्यांची बाजारपेठ तेजीत आली आहे. स्वेटर मफलर अशा विविध प्रकारचे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाली आहे. (Winter Shopping market for warm clothes booming as cold increases Nashik News)
गेल्या महिन्यात थंडी वाढण्यास सुरवात झाली होती. उबदार कपड्यांना मागणी होत होती. त्यानंतर मध्यंतरी अचानक पुन्हा तापमान वाढल्याने उकाडा जाणवू लागला होता. त्याचा परिणाम उबदार कपडे खरेदी विक्रीवर झाला होता. बाजारपेठ शांत झाली होती. गेल्या दोन दिवसापासून पारा पुन्हा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवार (ता.२३) रोजी अधिकच थंडी जाणवली. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा शेकोटी पेटली होती.
शनिवारी (ता.२४) व रविवारी (ता.२५) देखील दिवसभर गारवा जाणवत होता. त्यामुळे उबदार कपड्यांची बाजारपेठ पुन्हा तेजीत आल्याचे चित्र शालिमार, मेनरोड तसेच तिबेटियन मार्केट परिसरात बघावयास मिळाले. शनिवारच्या सुट्टीच्या औचित्य साधत विविध प्रकारच्या खरेदीसह उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. स्वेटरसह जॅकेट कानटोपी, हातमोजे, पायमोजे, लहान मुले, महिलांचे स्वेटर अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी उसळली होती.
तीनशे रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत विविध प्रकारचे कलरफूल, डिझाईनचे आकर्षक स्वेटर विक्री होत आहे. पुरुषांकडून जॅकेटला अधिक पसंती मिळत आहे. महिलांचे स्वेटर अधिक प्रमाणात खरेदी-विक्री होताना दिसले. शरणपूररोड येथील तिबेटियन मार्केटमध्ये देखील अशाच प्रकारची गर्दी दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी उबदार कपड्यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
जॅकेट, ब्युटी गर्ल स्वेटरला अधिक मागणी
पुरुषांकडून ओसवाल स्वेटर, हाफ बाईचे स्वेटर तसेच लेदर जॅकेटला अधिक पसंती मिळत आहे. तर महिलांकडून डिझाईनचे ब्युटी गर्ल स्वेटरला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. ओसवाल स्वेटर ३५० तर ब्युटी गर्ल स्वेटर ६०० रुपयात विक्री होत आहे. तर लेदर जॅकेट ६०० पासून ते १ हजार रुपयेपर्यंत विक्री होत आहे.
"दोन दिवसापासून शहरात रात्रीच्या सुमारास जाणवणाऱ्या थंडीने नाशिककरांना हुडहुडी भरत आहे. काही दिवसांपासून उबदार कपड्यांचा व्यवसाय मंदावला होता. त्यात पुन्हा तेजी आली आहे." - आसिफ खान विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.