Winter Viral Disease : हवामान बदलाने सिन्नरला रूग्णसंख्येत वाढ!

winter viral disease
winter viral diseaseesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : वातावरणात गेल्या काही दिवसांमुळे झालेल्या बदलाने सर्दी, खोकला आणि ताप या सारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. या बदलामुळे सिन्नर शहरात देखील यामुळे रोगामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर उपचार घेण्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. अचानक होणाऱ्या बदलांमुळे शहर पुन्हा आजारी पडल्याचे पाहायला मिळत आहे. (Winter Viral Disease Increase in number of patients due to climate change Nashik News)

पावसाळा संपल्यानंतर जिल्हासह शहरात कडाक्याची थंडी पडली होती. मात्र मागील पाच ते सहा दिवसामध्ये पुन्हा वातावरणामध्ये बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या आजाराने रुग्ण मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहे. सध्याचे वातावरण विषाणूंच्या वाढीस पोषक असल्याने विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

त्यातच गोवर, झिका, अशा आजारांनी चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करण्याची सल्ला दिला जात आहे.

अशी घ्यावी काळजी

-दूरचा प्रवास करताना शक्यतो तोंड, नाक आणि कान झाकलेले असावेत.

- औषधे स्वतःच्या मनाने न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन घ्यावी.

- दूध हळद, आल्याचा चहा, गरम पाणी यांचे सेवन करावे.

- व्हिटॅमिन 'ए' 'सी' युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

- हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा यांचा समावेश असावा.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

winter viral disease
Dhule Crime News : अवैध, बनावट मद्यनिर्मिती; नाशिकच्या पथकाची कारवाई

"सध्या सकाळच्या वेळी दमट हवा, दुपारी तीव्र उष्णता आणि बोचक थंडीचा कडाका, असे विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. विषम हवेमुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये श्वसनाच्या समस्या, अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, डोकेदुखी लक्षणे दिसत आहे. अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासून घ्यावे." - डॉ. महेश खैरनार , जनरल फिजिशियन, सिन्नर

"गोवर, न्यूमोनिया, रोटा व्हायरस, बूस्टर असे लसीकरण कोरोनामुळे मागे पडले असेल तर ते वेळापत्रकानुसार पूर्ण करून घ्यावे. नवजात बाळाला बीसीजी, कावीळ आणि पोलिओ दीड, अडीच आणि साडेतीन महिन्याला देण्यात येणाऱ्या ट्रिपल, हिपेटायटिस बी, रोटा, न्यूमोनिया, गोवर या लसी वेळापत्रकानुसार देण्यात याव्यात. लसीकरण हे खूप महत्त्वाची बाब आहे हे पालकांनी प्रत्येक वेळेस बघावे." - डॉ. आनंद नागरे, बालरोगतज्ज्ञ, सिन्न

winter viral disease
MSEDCL Go Green : पेपरलेससाठी मदत करा, वीजबिलात सवलत घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.