Nashik News : नाशिक रोडला गोरेवाडीत जादूटोण्याचा प्रयत्न; अंनिस पोलिस संरक्षणात बाहुल्या काढणार

Rajendra Fegde, Sudesh Ghoderao, Vijay Khanderao, Rajesh Shinde of 'Annis' while inspecting the dolls, lemons and chillies hanging on the acacia tree in Gorewadi.
Rajendra Fegde, Sudesh Ghoderao, Vijay Khanderao, Rajesh Shinde of 'Annis' while inspecting the dolls, lemons and chillies hanging on the acacia tree in Gorewadi.esakal
Updated on

Nashik News : येथील परिसरातील गोरेवाडीत जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नागरिक भयभीत झालेले असून बाभळीच्या झाडाला लावलेल्या लिंबू मिरच्या बाहुल्या आणि मनातील इच्छा मजकूर असलेल्या चिठ्या आढळून आले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हा लक्षात आल्यानंतर अंनिस कार्यकर्त्यांनी तत्काळ गोरेवाडी धाव घेऊन पोलिस संरक्षणात झाडावरच्या बाहुल्या उतरवल्या जाव्यात, यासाठी पोलिसात निवेदन दिले. (Witchcraft attempt at Gorewadi on Nashik Road anti superstitious committee will remove dolls under police protection Nashik News)

गोरेवाडी शाळेच्या दहाचाळच्या कडेला रेल्वे रुळाजवळ असलेल्या बाभळीला खिळ्याच्या साहाय्याने ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, लिंबू, नारळ, उडीद, बिबा, मिरच्या, कोहळा आदी वस्तू गुरुवार (ता.२०) अमावस्येच्या दिवशी नागरिकांना आढळल्या.

या ठिकाणी मनातील इच्छा असणारा मजकूर लिहिलेल्या चिठ्या आढळल्या. दुष्मानाचा फोटो, त्याचे नाव मजकुरात लिहिलेले आहे. वहीच्या कागदावर सदर मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.

करणी, भानामती, भूतबाधा असल्याचा प्रकार प्रथमदर्शनी नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी घटना स्थळावर भेट देऊन हा प्रकार समजून घेतला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Rajendra Fegde, Sudesh Ghoderao, Vijay Khanderao, Rajesh Shinde of 'Annis' while inspecting the dolls, lemons and chillies hanging on the acacia tree in Gorewadi.
Child Marriage: ZP उपाध्यक्षांनी रोखला बालविवाह; शासकीय यंत्रणेसोबत पदाधिकाऱ्यांचाही पुढाकार

या बाहुल्या नेमक्या कोणी लावल्या या संदर्भात अंनिसचे कार्यकर्ते गुप्त पद्धतीने शोध घेत आहेत. या प्रकारामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. या संदर्भात अंनिस ने नाशिक रोड पोलिसांना हा प्रकार सांगितला असून पोलिस संरक्षणात बाहुल्या काढण्याची विनंती केली आहे.

जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन संशयित सदर गैरप्रकाराला उत्तेजना देणारा बाबा,बुवा, भगत पकडून कारवाईची मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.

"आम्ही घटनास्थळी भेट दिली असून घडलेला प्रकार गंभीर आहे. पोलिस ठाण्याला सदर घटनेचे लेखी निवेदन दिले असून पोलिसांना जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्याची विनंती केली आहे. पोलिस संरक्षणात लिंबू-मिरच्या बाहुल्या काढल्या जाणार आहेत."

- डॉ. सुदेश घोडेराव. राज्य कार्यवाह, अंनिस.

"घटना गंभीर आहे. अनैतिक कामे करणारा संशयित पकडून कारवाई व्हायला हवी. या घटनेचा आम्ही वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करीत असून लिहिलेल्या चिठ्या व मजकूर कोणाचा आहे, कोणी लावला या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करायला हवी."

- विजय खंडेराव, उपाध्यक्ष, अंनिस, नाशिक रोड.

Rajendra Fegde, Sudesh Ghoderao, Vijay Khanderao, Rajesh Shinde of 'Annis' while inspecting the dolls, lemons and chillies hanging on the acacia tree in Gorewadi.
Sand Policy : 600 रुपये ब्रासप्रमाणे वाळू मिळायला लागणार 2 महिने! नव्या धोरणात ऑनलाईन विक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.