Nashik News : श्री. बेलेकर गेल्या पंधरा दिवसांपासून पिल्लाचा अभ्यास करत आहेत. लांडगे येतात कुठून आणि राहतात कुठे? याचा त्यात समावेश आहे.
लांडगा हा सस्तन प्राणी कॅनिडी कुळातील आणि श्वानाच्या प्रजातीतील आहे. लांडग्याची लांबी ९० ते १०५ सेंटिमीटर, शेपूट ३५ ते ४० सेंटिमीटर, खांद्याजवळची उंची ६५ ते ७५ सेंटिमीटर असते. (Wolf hybrid puppy Found near Dhodap Fort nashik news)
नर-मादी यांचा जोडा जन्मभर टिकतो. लांडगे लांब अंतरावरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रडतात. लांडग्याच्या रडण्याचा आवाज दहा मैल दूरपर्यंत ऐकू येतो. जिल्ह्यात कमी होणाऱ्या कुरणामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. लांडगा हा गवताळ कुरण क्षेत्रात राहणे पसंत करतो.
धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी (ता. चांदवड) परिसरात पक्षिमित्र किरण बेलेकर हे पक्ष्यांचा अभ्यास करत असताना कुरण क्षेत्रात त्यांना श्वानाचे (Dog) पिल्लू दिसले. नंतर त्या पिलाची आई बाहेर आली. मग त्यांच्या निदर्शनास आले, की ते लांडग्याचे पिल्लू आहे. जंगलातील लांडगा आणि श्वानाच्या संकरणातून हे पिल्लू जन्मास आल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पूर्वी अनेक ठिकाणी जंगलात लांडग्याचे पिल्ले सापडत असे. ते घरी आणून ती पाळली जात असे. त्यातून संकरित पिल्ले जन्माला येत होती. पण धोडप किल्ल्याच्या परिसरात राहणारी लांडग्याची मादी आणि मेंढपाळांसोबत असलेल्या श्वानाचे जंगलात संकरण झाले असावे, ही दुर्मिळ घटना मानली जाते. लांडगे आणि श्वानांचा आनुवंशिक अभ्यास करताना श्वानांची प्रजाती लांडग्यांपासून तयार झाल्याचे दिसून येत. त्यापैकी ३८ उपप्रजाती ज्ञात आहेत.
"धोडप किल्ला परिसरात दहा वर्षांपासून पक्ष्यांचा अभ्यास करत आहे. या परिसरात मला १६० जातीचे पक्षी दिसले आहेत. पक्षी निरीक्षण करताना जंगलात संकरित लांडग्याचे पिल्लू दिसले. खूप आश्चर्य वाटले. असे प्रकार धोक्याची घंटी असून, आता सावध होऊन निसर्ग संवर्धनासाठी काम करायला हवे. कुरणे वाचविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा." - किरण बेलेकर (पक्षिमित्र)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.