Nashik Hospital Newborn Swap : जन्माला आला मुलगा अन् हातात दिली मुलगी... नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रकाराने खळबळ

Woman claims hospital staff gave her wrong newborn in Nashik : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या एका मातेला मुलाला जन्म दिला, मात्र डिस्चार्ज करताना रुग्णालयाने त्यांच्या हातात मुलगी सोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Woman claims hospital staff gave her wrong newborn in Nashik
Woman claims hospital staff gave her wrong newborn in Nashik
Updated on

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या एका मातेला मुलाला जन्म दिला, मात्र डिस्चार्ज करताना रुग्णालयाने त्यांच्या हातात मुलगी सोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर एकच गदारोळ झाला तसेच महिलेच्या नातेवाईकांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिला.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी गेली होती. या महिलेने एका मुलाला जन्म दिला. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज देताना त्यांना मुलगी झाल्याचे सांगण्यात आले आणि बाळही सोपवण्यात आले. या प्रकाराने नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला. महत्वाची बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरवर देखील मुलगा झाल्याची नोंद होती मात्र रुग्णालयाने त्यांना मुलगी झाल्याचे सांगितले.

Woman claims hospital staff gave her wrong newborn in Nashik
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

दरम्यान या प्रकारानंतर महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरापर्यंत चांगलाच गोंधळ घातला. बाळ ताब्यात घेण्यासही कुटुंबियांनी नकार दिल्याने वेगळाच पेच निर्णाण झाल्याचे पाहायला मिळाले . दरम्यान याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू असून जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Woman claims hospital staff gave her wrong newborn in Nashik
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग मित्रासाठी मित्राने असं काही केलं की... हृदयाला स्पर्शून जाणारा व्हिडीओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.