Nashik Crime News : धनादेश न वाटल्याप्रकरणी महिलेला कारावास अन् 8 लाखांचा दंड!

cheque bounce
cheque bounceesakal
Updated on

नाशिक : एका कंपनीचे डायरेक्टर आणि मित्राची पत्नी असलेल्या महिलेस उसनवार दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात महिलेने धनादेश दिला असता तो न वाटल्याप्रकरणी न्यायालयाने डायरेक्टर महिलेस एक वर्ष साधा कारावास व आठ लाख पंधरा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Woman jailed and fined 8 lakhs for cheque bounce Nashik Crime News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

cheque bounce
Nashik Crime News : रेल्वे कर्मचारी मारहाणप्रकरणी आरोपीस 4 वर्षांचा कारावास!

स्विटी कमलेश शिंगाणे ऊर्फ स्विटी शरद साने असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कनक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या त्या डायरेक्टर आहेत. व्यावसायिक अमोल अहिरराव यांनी त्यांचे मित्र कमलेश नामदेव शिंगाणे यांची पत्नी स्विटी यांना रक्कम ४ लाख ८५ हजार रक्कम व्यवसायकामी उसनवार दिली. परतफेडीपोटी सदर महिलेने अहिरराव यांना चार लाख ८५ हजार रुपयांचा धनादेश कंपनीच्या नावाने दिला होता.

सदर धनादेश न वटल्याने अहिरराव यांनी नाशिक येथील न्यायालयात २०१८ मध्ये केस दाखल केली होती. सदर महिलेने वेळकाढूपणा करत सदर पैशाचा वापर करून घेतला. या प्रकरणी न्यायालयाने महिलेस दोषी ठरवून एक महिन्याचा साधा कारावास आणि आठ लाख १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. रक्कम न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा दिली. ॲड. राहुल पाटील यांनी अहिरराव यांच्यातर्फे काम पाहिले.

cheque bounce
Nashik News : पुना रोडवरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी; रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()