Nashik Crime : नाशिक पुणे महामार्गावरील असलेल्या शिंदे (नाशिक) येथे एका महिलेचा तिच्याच ओळखीच्या माणसाने चाकूने मानेवर वार करून खून केल्याचा प्रकार घडला असून नाशिक रोड पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे शिंदे गाव परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर महिला देवाची गादी चालवित होती महिलेकडून फसवणूक झाल्याच्या कारणावरून भक्ताने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारले. (Woman killed by devotee due to cheating at shinde nashik Crime News)
या बाबत पोलिसांनी सांगितले अशी की, जनाबाई भिवाजी बर्डे (वय ४५) राहणार शिवरत्न चौक, शिंदे ही महिला देवाची गादी चालवते असे भासवून अनेक लोकाच्या दुखात मार्ग सांगत असे.
त्या मुळे अनेक नागरिक या महिलेकडे "बाहेर चे पाहण्यासाठी "तिच्या कडे येत होते. अनेक दिवसांपासून निकेश दादाजी पवार हा युवक तिच्या कडे समस्या घेऊन येत होता, मात्र त्याला त्याने समाधान होत नसल्याने तो अस्वस्थ होता.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास संशयित निकेश पवार हा या महिलेच्या घरी गेला, जरा वेळ बसला आणि तिची नजर चुकवून जवळ असलेल्या चाकू ने जनाबाई बर्डे हिच्या मानेवर व शरीरावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने व वार उर्मी लागल्याने जनाबाई बर्डे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जनाबाई निचपीत पडल्याने हल्लेखोर निकेश हा चाकू हातात घेऊन पळू लागला. जनाबाई हिच्या मावस बहीण रंजना माळी यांनी घटना पाहून हल्लेखोरांचा ओरडत मागे धावली, लोक ही त्याला पकडू लागले मात्र तो महामार्गाने पळत टोलनाका पर्यंत गेला.
नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला माहिती समजताच त्यांनी टोलनाका येथे धाव घेऊन हल्लेखोर पवार यास ताब्यात घेतले. जनाबाई बर्डे हिला अक्षय नावाचा मुलगा आहे तर संशयित आरोपी निकेश पवार हा अविवाहित आहे .
दरम्यान सदरची घटना समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे पोलीस निरीक्षक पवन चौधरी सहायक पोलीस निरीक्षक शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.