नाशिक : पावसाळा संपला तरीही अद्यापपर्यंत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. बहुतांशी रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. पुणा रोडवरील क्रोमा शोरुमसमोरही रस्त्यात खड्डा असून, याच खड्डयात दुचाकी आदळून पाठीमागे बसलेल्या महिला पडल्याने त्यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे शहरातील खड्डयांची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. (Woman killed by pothole on Puna Road issue of potholes on road Nashik News)
पुष्पा संभाजी शिंदे (४५, रा. प्रभुनगर, सातपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. गेल्या मंगळवारी (ता. २७) पुष्पा शिंदे या दुचाकीवर पाठीमागे बसून नाशिकरोडकडून सातपूरकडे जात होत्या. त्यावेळी बोधलेनगर सिग्नल येथील क्रोमा शोरुमसमोर नाशिक-पुना रोडवर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या पुष्पा शिंदे या दुचाकीवरून खाली पडल्या.
या दुर्घटनेमध्ये पुष्पा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना सहयाद्री हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक-पुना रोड रस्त्याची दुरवस्था
नाशिक-पुना रोडवर ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. राज्यमार्ग असताना या मार्गांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी या रस्त्यावरील खडी निघून गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे.
अवझड वाहनांमुळे अनेक ठिकाणी रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा अपघात होतात. परंतु तरीही या रस्त्याचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी असून, अजून किती बळी घेणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.