चिमुकलीच्या तत्परतेमुळे वाचला आईचा जीव; सर्वत्र होतंय कौतुक

woman life was saved due to the promptness of the girl
woman life was saved due to the promptness of the girlSakal
Updated on

जुने नाशिक : चिमुकलीच्या समयसूचकता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आईचे प्राण वाचले. गंजमाळ भागात शुक्रवारी (ता. १३) दुपारी ही घटना घडली. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, ती सुस्थितीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गंजमाळ पोलिस चौकी शेजारी झोपडपट्टीत सदर ४५ वर्षीय महिला वास्तवास आहे. तिच्या पतीने तिला घटस्फोट देण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यातून दोघांचा वाद झाला. वाद मोठ्या प्रमाणावर झाल्याने पती काही वेळाने तेथून निघून गेला. त्यामुळे वाद संपला होता. तरीदेखील महिलेने रागाच्या भरात घरातील पंख्यास साडी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रकार घरात तिच्या मुलीसमोर घडला.

woman life was saved due to the promptness of the girl
नाशिक जिल्‍ह्यात चार दिवसांनंतर शंभर पेक्षा कमी कोरोना बाधित

घाबरलेल्या अवस्थेत तिने गंजमाळ चौकीतील पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शोध पथकास घटनेची माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, सेदाने, सहाय्यक उपनिरीक्षक कडाळे, ठाकरे यांच्यासह गंजमाळ चौकीतील हवालदार नरेंद्र जाधव, युवराज पाटील, बीट मार्शल हासे, सहाणे काही मिनिटात घटनास्थळी दाखल होत बंद दरवाजा खोलून आत प्रवेश केला. महिला साडीच्या साह्याने पंख्यास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिच्या गळ्यातील साडी कापून तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या लहान मुलीने योग्य वेळी दाखवलेली समयसूचकता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. तिचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त करत पोलिस आणि चिमुकलीचे कौतुक केले.

woman life was saved due to the promptness of the girl
नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे लक्ष 'किंगमेकर' ठरण्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.